आयपीएलमध्ये आज 26 सप्टेंबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमने- सामने येतील. दोन्ही संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना खालील विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे-
-सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर यांच्यात एकूण 17 सामने झाले आहेत. त्यापैकी 7 सामने सनरायझर्स हैदराबाद संघाने जिंकले आहेत. केकेआर संघाने 10 सामने जिंकले आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला केकेआरविरुद्ध 8 व्या विजयाची संधी असेल, तर केकेआरला त्यांच्या 11 व्या विजयाची संधी असेल.
-या सामन्यात केकेआरचा फिरकीपटू सुनिल नरेनने 5 षटकार ठोकले तर तो आयपीएलमध्ये आपले 50 षटकार पूर्ण करेल.
-सुनिल नरेनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 6 वेळा चार बळी घेतले आहेत. या सामन्यातही त्याला चार बळी मिळाल्यास तो वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा 6 वेळा चार बळी घेण्याचा विक्रम मोडेल.
-या सामन्यात हैदराबादचा फलंदाज विलियम्सनने 6 षटकार लगावले, तर तो आयपीएलचे 50 षटकार पूर्ण करेल.
-केकेआरचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल 2 चौकार ठोकताच आयपीएलमध्ये तो 100 चौकार पूर्ण करेल.
-हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 44 अर्धशतके ठोकली आहेत. या सामन्यातही त्याने अर्धशतक ठोकले, तर आयपीएलमध्ये 45 अर्धशतके ठोकणारा तो पहिला फलंदाज बनेल.
-या सामन्यात हैदराबादचा फलंदाज मनीष पांडेने 120 धावा केल्या तर आयपीएलमध्ये 3000 धावा करणारा तो 16 वा खेळाडू बनेल.
-जर आंद्रे रसलने या सामन्यात 89 धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये 1500 धावा करणारा 47 वा खेळाडू बनेल.