आयपीएल 2025 हंगामातील पंधरावा सामना आज (03 एप्रिल) रोजी खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने- सामने होते. हा सामना कोलकाता मधील ईडन गार्डनवर खेळला गेला. हा सामना केकेआर संघाने 80 धावांनी जिंकला. या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि केकेआरला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. केकेआरने प्रथम फलंदाजी करून 200 धावा केल्या होत्या. तसेच हैदराबादला जिंकण्यासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हैदराबाद संघ 16.4 षटकातच 120 धावांवर ऑल आउट झाला.
केकेआरसाठी प्रथम फलंदाजी करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 29 चेंडूत 60 धावांची तुफानी पारी खेळली. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 38 धावा तर अंघकृष रघुवंशीने 32 चेंडू अर्धशतकी खेळ केली. क्विंटन डीकॉक आणि सुनील नरेन हे आज काही प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत.
केकेआरसाठी वैभव अरोराने 3 विकेट्स, वरूण चक्रवर्तीने 3 विकेट्स तसेच रसल, नरेन, राणा यांनी 1-1 विकेट्स घेतली.
हैदराबाद संघातील कोणताच फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. केकेआरच्या गोलंदाजांनी त्यांचा चांगलाच धुवा उडवत विजय मिळवला.
तसेच हैदराबादसाठी मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. तसेच कर्णधार पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली. हर्षद पटेलने ही 2 विकेट घेतल्या.
प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात खराब झाली होती त्यांनी 16 धावांवर दोन खेळाडू गमावले होते. त्यानंतर कर्णधार अजिंक्य व अंघकृष रघुवंशीने भागीदारी करत संघाला सावरले. या विजयाबरोबरच केकेआर संघाकडे गमावलेला आत्मविश्वास परत आला असेल.