---Advertisement---

आरसीबीच्या ‘या’ गोलंदाजाची केकेआरमध्ये एन्ट्री, कामगिरी पाहून तुम्हालाही फुटेल घाम!

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 12:52 AM
---Advertisement---

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. तसेच काही संघांनी आपल्या संघात नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील एका अनुभवी आणि धाकड खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघात ओएन मॉर्गन, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक सारखे अनुभवी आणि आक्रमक खेळाडू आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने देखील आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यात तो खेळताना दिसून येणार नाहीये. त्याने वैयक्तिक कारणास्तव उर्वरित हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याऐवजी न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साउदीला संधी देण्यात आली आहे.(Kkrh sign Tim Southee for remaining matches of ipl 2021)

कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचाइजीतील एका सूत्राने गुरुवारी (२६ ऑगस्ट) क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, टीम साउदी दुसऱ्या टप्प्यात केकेआर संघात खेळणार आहे. सलग ६ वर्षे आयपीएल स्पर्धा खेळल्यानंतर २०२० मध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावात त्याला कोणीच खरेदी केली नव्हते, ज्यामुळे त्याला स्पर्धा खेळता आली नव्हती.

टीम साउदीने २०१९ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१९ च्या हंगामात त्याला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या दरम्यान त्याने १३ च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत १ गडी बाद केला होता. तसेच त्याने टी-२० कारकिर्दीत एकूण २०१ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ८.३१ च्या इकोनॉमीने २२३ गडी बाद केले आहेत.

आयपीएल स्पर्धेत टीम साउदीने या संघांचे केले आहे प्रतिनिधित्व
चेन्नई सुपर किंग्ज – (२०११)
राजस्थान रॉयल्स- (२०१४-२०१५)
मुंबई इंडियन्स – ( २०१६- २०१७
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – (२०१८-२०१९)

महत्त्वाच्या बातम्या-

पंजाब किंग्जला मजबूती, १४ कोटींच्या खेळाडूच्या जागी इंग्लंडच्या ‘या’ श्रेयस्कर गोलंदाजांची निवड

काय सांगता? ३७.५० कोटी देऊन खरेदी केलेले ‘हे’ क्रिकेटर दुसऱ्या टप्प्यातून बाहेर; बघा यादी

आयर्लंडच्या सलामीवीराचे टी२०त नाबाद शतक, चक्क १६४ धावांनी जर्मनीला चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---