Loading...

…तर धोनी, विराट यांचा सामावेश असणाऱ्या यादीत केएल राहुलही होणार सामील

हैद्राबाद। आजपासून(6 डिसेंबर)  भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 सामन्यांची टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज केएल राहुलला(KL Rahul) एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

Loading...

या सामन्यात जर राहुलने 26 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावांचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ सातवा क्रिकेटपटू ठरेल.

याआधी रोहित शर्मा(Rohit Sharma), विराट कोहलीVirat Kohli), एमएस धोनी(MS Dhoni), सुरेश रैना(Suresh Raina), शिखर धवन(Shikhar Dhawan) आणि युवराज सिंग(Yuvraj Singh) या भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे यातील रोहित आणि विराटने टी20मध्ये 2000 धावांचा टप्पाही पार केला आहे.

Loading...

सध्या केएल राहुलने 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 2 शतके आणि 6 अर्धशतकांसह 974 धावा केल्या आहेत.

आज होणारा भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू (Most T20I runs for India) –

Loading...
Loading...

2539 धावा – रोहित शर्मा

2450 धावा – विराट कोहली

Loading...

1617 धावा – एमएस धोनी

1605 धावा – सुरेश रैना

1504 धावा – शिखर धवन

1177 धावा – युवराज सिंग

974 धावा – केएल राहुल

You might also like
Loading...