माऊंट मॉनगनुई। आज(11 फेब्रुवारी) भारताचा न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा सामना बे ओव्हल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.
या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी करत अनेक विक्रम केले.
त्याने या सामन्यात 113 चेंडूत 112 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. हे केएल राहुलचे वनडे कारकिर्दीतील चौथे शतक आहे. विशेष म्हणजे ही चारही शतके त्याने वेगवेगळ्या देशात केली आहेत.
त्याने त्याचे वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झिम्बाब्वे विरुद्ध हरारे येथे जून 2016मध्ये केले होते. त्यानंतर त्याने जून 2019 ला श्रीलंका विरुद्ध लीड्स, इंग्लंड येथे दुसरे वनडे शतक केले. यानंतर त्याने तिसरे वनडे शतक मायदेशात म्हणजेच भारतात विशाखापट्टण येथे वेस्ट इंडिज विरुद्ध केले होते.
आजच्या सामन्यात राहुल व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर मनिष पांडेने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ 40 धावांची खेळी करुन धावबाद झाला. या खेळाडूंनी केलेल्या खेळाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 296 धावा केल्या आणि न्यूझीलंडला 297 धावांचे आव्हान दिले.
न्यूझीलंडने हे आव्हान 47.1 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल(66), हेन्री निकोल्स(80) आणि कॉलिन डी ग्रँडहोम(58*) यांनी अर्धशतके केली.
https://twitter.com/Maha_Sports/status/1227158950581166080
केएल राहुल असा कारनामा करणारा भारताचा पहिलाच विकेटकीपर
वाचा????https://t.co/C78dE4975J????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @klrahul11— Maha Sports (@Maha_Sports) February 11, 2020





