भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग ५ वर्षे कसोटी क्रिकेटवर अधिराज्य गाजवले आहे. परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये फ्लॉप ठरत असल्यामुळे नेहमीच त्याच्या नेतृत्वावर टीका केली गेली आहे. परंतु असेही काही दिग्गज खेळाडू खेळाडू आहेत, ज्यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले आहे. यामध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याची भर पडली आहे.
विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल याने फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक करताना म्हटले की, “विराट कोहलीसोबत आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळून मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की, तो एक वेगळ्याच शैलीचा कर्णधार आहे. तो एक भावूक व्यक्ती आहे. अनेकांना वाटते की १०० टक्के देणे म्हणजे पूर्ण प्रयत्न केले. परंतु तो २०० टक्क्यांवर काम करतो. त्याच्याकडे आणखी १० लोकांना पुढे घेऊन जाण्याची आणि त्यांनाही १०० हून २०० टक्क्यांपर्यंत खेचून नेण्याची अविश्वसनीय क्षमता आहे.” (Kl rahul admires Virat kohli’s captaincy says he always gives you 200 percent)
केएल राहुल कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुल देखील मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे.
त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. परंतु असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याला संधी देण्यात येऊ शकते. केएल राहुल मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. राहुलने २०१९ मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
केएल राहुलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्येही त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळाली तर तो आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
‘टीम इंडिया, हार्दिकच्या भरोश्यावर राहण थांबवा; नवा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शोधा’
‘कोणीतरी याला स्माइल करायला सांगा’; रोहितच्या गंभीर लूकला बघून पत्नी रितीकाचा प्रेमळ सल्ला