---Advertisement---

गुड न्यूज! स्टार भारतीय फलंदाजाच्या घरी लवकरच पाळणा हलणार, बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी आनंदाची बातमी

On: शुक्रवार, नोव्हेंबर 8, 2024 6:05 PM
Athiya-Shetty-KL-Rahul
---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये असून त्याच्यावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व टीकेदरम्यान राहुलनं शुक्रवारी (8 नोव्हेंबर) एक मोठी घोषणा केली. राहुलनं आपल्या चाहत्यांना अशी बातमी दिली आहे, जी ऐकून कुणालाही आनंद होईल.

वास्तविक, केएल राहुल लवकरच पिता होणार आहे. या भारतीय फलंदाजानं सांगितलं की, त्याच्या आणि त्याची पत्नी अथिया शेट्टीच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. राहुलनं सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितलं की, त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म 2025 मध्ये होईल. राहुलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं- “आम्हाला लवकरच सुंदर आशीर्वाद मिळणार आहे. 2025.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

 

केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा विवाह 23 जानेवारी 2023 रोजी झाला. योगायोगानं राहुलचं लग्नही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच झालं होतं. आता त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माची बातमी शेअर केली आहे.

केएल राहुल सध्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. तेथे तो भारत ‘अ’ संघाकडून ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध अनधिकृत कसोटी सामना खेळत आहे. हा सामना त्याच्यासाठी चांगला राहिला नसला तरी, या गोड बातमीनंतर त्याचं नशीब पलटेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

केएल राहुल 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत टीम इंडियासाठी सलामीला खेळताना दिसू शकतो. नियमित सलामीवीर रोहित शर्मा खाजगी कारणांमुळे मालिकेतील सुरुवातीचे सामने खेळणार नाही. त्याच्याजागी राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. तो या सामन्यात यशस्वी जयस्वालसोबत सलामीला उतरेल. सूत्रांनुसार, रोहित शर्मा दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. यासाठी त्याला त्याची पत्नी रितिकासोबत राहायचं आहे. अशा स्थितीत तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही.

हेही वाचा – 

बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारताची सर्वात मजबूत प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळू शकते संधी
मोहम्मद रिझवानचं नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच पाकिस्तानी
पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हाणलं, वनडे सामन्यात एकतर्फी विजय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---