---Advertisement---

अर्रर्र! ४९ वर रनआऊट होताच केएल राहुलचा सूर्यकुमारवर संताप, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: बुधवार, फेब्रुवारी 9, 2022 7:28 PM
KL-Rahul-Suryakumar-Yadav
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात बुधवारी (९ फेब्रुवारी) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात भारतीय फलंदाजी थोडी गडबडलेली दिसली.पण, तरी सकारात्मक गोष्ट अशी की, केएल राहुल  (KL Rahul)आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)यांच्यात महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र, ही भागीदारी नाट्यपूर्ण घटनेने तुटली. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

केएल राहुल झाला धावबाद
झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने ४३ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण, त्यानंतर उपकर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. पण, ही भागीदारी केएल राहुल धावबाद झाल्याने तुटली. विशेष म्हणजे केएल राहुल ४९ धावांवर असताना धावबाद झाला. त्यामुळे त्याचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले.

झाले असे की, केमार रोच गोलंदाजी करत असलेल्या ३० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर केएल राहुलने शॉट खेळला. यावर त्याने २ धावांसाठी कॉल दिला. त्यामुळे सूर्यकुमार आणि त्याने पहिली धाव यशस्वी पूर्ण केली. पण, दुसऱ्या धावेच्यावेळेला सूर्यकुमार आणि केएल राहुलने धावायला सुरुवात केली, पण राहुल अर्ध्यावर येऊन गडबडला आणि थांबला. काही क्षण थांबल्यानंतर त्याने पुन्हा पळायला सुरुवात केली. पण, तोपर्यंत अकिल हुसेन आणि शाय होपने मिळून राहुलला धावबाद केले. अगदी थोड्या अंतराने केएल राहुल क्रिजपासून दूर राहिला. यानंतर तो बाद होऊन परत जात असताना सूर्यकुमारला काहीतरी बोलताना दिसला (KL Rahul Run Out). 

व्हिडिओ पाहाण्यासाठी इथे क्लिक करा

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, ४९ धावांवर वनडेत धावबाद होणारा केएल राहुल पाचवा भारतीय आहे. यापूर्वी रवी शास्त्री, दिनेश मोंगिया, मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड ४९ धावांवर वनडेत धावबाद झाले आहेत.

सूर्यकुमारचे अर्धशतक
केएल राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी घेत वॉशिंग्टन सुंदरबरोबर ५ व्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान सुर्यकुमारने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ८३ चेंडूत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरने २४ धावा केल्या. त्यानंतर दीपक चाहरने २९ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त अन्य कोणालाच २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे भारताला ५० षटकांत ९ बाद २३७ धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

वनडे क्रमवारी: टॉप-३ मध्ये विराटच्या जवळ पोहोचला रोहित, पण आझमची दशहत अजूनही कायम

भारत वि. वेस्ट इंडिज वनडे मालिकेसंदर्भात माजी भारतीय क्रिकेटरची भविष्यवाणी; ‘रोहितसेना २-१ने सीरिज…

सूर्यकुमारचे अर्धशतक ठरले विक्रमी! ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---