भारताने झिम्बाब्वेला ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-०ने मात दिली. विशेष म्हणजे दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजसाठी आलेल्या शुबमन गिलने शतक झळकावले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक होते. याबाबतीत कर्णधार केएल राहुलने त्याचे विशेष कौतुक केले.
युवा फलंदाज शुबमन गिलचे कौतुक करताना केएल राहुल म्हणाला की, “शुबमन गिल आयपीएलपासून चांगली फलंदाजी करत आहे. फलंदाजी करताना तो खूपच आकर्षक दिसतो, त्याचा आत्मविश्वासही अप्रतिम आहे. यासाठी संयम आवश्यक आहे, यावरून त्यांचाही स्वभाव चांगला असल्याचे दिसून येते.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शतकवीरानेच काढला शतकवीराचा काटा, शुबमनने घेतला सिकंदरचा डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल
‘त्यांनी चांगली टक्कर दिली’, मालिका विजयानंतर भारतीय कर्णधाराने केलं प्रतिस्पर्धींच तोंडभरून कौतुक






