जोहान्सबर्गच्या मैदानावर (Johannesburg) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India second test) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला जोरदार प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळवला होता. यासह कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु या सामन्यात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुलला (Kl Rahul captain) देण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासह कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा राहुल ३४ वा कर्णधार ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसल्याने त्याला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. आता विराटच्या अनुपस्थितीत राहुलला ही मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे.
ही जबाबदारी स्विकारत केएल राहुल हा भारतीय कसोटी संघाच्या आजपर्यंतच्या एकूण कर्णधारांपैकी चौथा कानडी व्यक्ती बनला आहे. यापूर्वी कर्नाटक राज्याचे ३ दिग्गज खेळाडू होते, ज्यांना भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. गुंडप्पा विश्वनाथ यांनी २ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तर राहुल द्रविड यांनी २५ आणि अनिल कुंबळे यांनी १४ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
भारतीय संघाचे नेतृत्व करणारे कानडी क्रिकेटपटू
१) २ सामने – गुंडप्पा विश्वनाथ (१९८०)
२) २५ सामने – राहुल द्रविड (२००३- २००७)
३) १४ सामने – अनिल कुंबळे ( २००७- २००८)
या करणामुळे विराट कोहली संघाबाहेर
विराटच्या अनुपलब्धतेबद्दल माहिती देताना प्रभारी कर्णधार राहुल म्हणाला की, “दुर्दैवाने विराटला पाठीच्या वरच्या बाजूला दुखापत झाली आहे. फिजिओ त्याच्यावर काम करत आहेत आणि आशा आहे की तो पुढच्या कसोटीपर्यंत बरा होईल. विराटच्या जागी हनुमा विहारी खेळणार आहे. हा फक्त एकच बदल आहे.”
तसेच आपल्याला मिळालेल्या जबाबदारीबद्दल बोलताना राहुल म्हणाला, “आपल्या देशाचे नेतृत्व करणे हे प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते. खरोखर ही सन्मानाची गोष्ट आहे आणि मी या आव्हानाची वाट पाहत आहे. आम्हाला येथे काही चांगले विजय मिळाले आहेत आणि आशा आहे की आम्ही ते पुढे असेच सुरू ठेवू. एकूणच सेंच्युरियनमध्ये आम्ही चांगले खेळलो. आम्ही एक संघ म्हणून खरोखरच चांगली कामगिरी केली. आता या सामन्याबद्दल आम्ही खरोखरच उत्सुक आहोत.”
महत्वाच्या बातम्या :
तो लवकरच मोठी खेळी करेल; महागुरू द्रविडची ‘या’ फलंदाजाबद्दल मोठी भविष्यवाणी
हे नक्की पाहा:






