बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुलला आपली जादू दाखवण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. मात्र त्यानं आपल्या छोट्या पण महत्त्वाच्या 22 धावांच्या खेळीत एक विशेष कामगिरी केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करणाऱ्या खास फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
केएल राहुल 2014 पासून भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. आतापर्यंत त्यानं टीम इंडियासाठी 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्याच्या 228 डावांमध्ये त्यानं 8017 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 39.49 एवढी राहिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलच्या नावावर 17 शतकं आणि 54 अर्धशतकं आहेत. आतापर्यंत त्यानं एकूण 767 चौकार आणि 184 षटकार मारले आहेत. राहुलच्या बॅटमधून या धावा 76.82 च्या स्ट्राईक रेटनं निघाल्या आहेत.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिननं 1989 ते 2013 दरम्यान टीम इंडियासाठी एकूण 664 सामने खेळले. त्यानं 782 डावांमध्ये 48.52 च्या सरासरीनं 34357 धावा केल्या. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं आणि 164 अर्धशतकं आहेत.
केएल राहुल भारतासाठी 8000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा 17वा क्रिकेटपटू आहे. सध्याच्या भारताच्या सक्रिय खेळाडूंपैकी फक्त विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं टीम इंडियासाठी राहुलपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराटच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26,965 धावा आहेत. तो या यादीत सचिननंतर दुसऱ्या स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मानं 19245 धावा केल्या आहेत. तर 16व्या क्रमांकावर असलेल्या रहाणेच्या बॅटमधून 8414 धावा निघाल्या आहेत. रहाणे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे राहुलकडे त्याला मागे टाकण्याची संधी आहे.
हेही वाचा –
सततच्या फ्लॉप शोनंतर अखेर फॉर्म आला, दुलीप ट्रॉफीत अय्यरची टी20 स्टाईल बॅटिंग
शुबमन गिलच्या एका शतकानं मोडले अनेक रेकॉर्ड, ‘प्रिंस’ची सचिन-विराटच्या खास क्लबमध्ये एंट्री
शाकिब अल हसनचं नाव इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू