---Advertisement---

IND vs ENG: केएल राहुलचा इंग्लंडमध्ये नवा पराक्रम! तेंडुलकर-विराटच्या खास यादीत नोंदवले नाव

On: बुधवार, जुलै 23, 2025 7:06 PM
---Advertisement---

KL Rahul Record: मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टाॅस गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने या सामन्यात 11 धावा करून एक खास रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याने इंग्लंडमध्ये 1,000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत आणि असे करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे. (KL Rahul England Test record)

इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, तिथे सचिन तेंडुलकरचे नाव आघाडीवर आहे. तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडमध्ये 17 सामन्यांमध्ये 54.31च्या सरासरीने 1,575 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविडचे नाव आहे. द्रविडने इंग्लंडमध्ये 13 सामन्यांमध्ये 68.80च्या सरासरीने 1,376 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्करचे नाव आहे. इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून 16 सामन्यांमध्ये 1,152 धावा निघाल्या होत्या. (1000 Test runs in England)

माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडमध्ये 17 सामन्यांमध्ये 33.21च्या सरासरीने 1,096 धावा केल्या होत्या. तर मँचेस्टरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात 11 धावा करून केएल राहुलनेही आता इंग्लंडमध्ये 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये 1,008 धावा केल्या आहेत. त्याच्या धावसंख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला आता या यादीत विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी असेल. (Virat Kohli England Test)

इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय-

सचिन तेंडुलकर: 1,575 धावा
राहुल द्रविड: 1,376 धावा
सुनील गावस्कर: 1,152 धावा
विराट कोहली: 1,096 धावा
केएल राहुल: 1,008* धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---