भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात मनाप्रमाणे केली. रविवारी (17 डिसेंबर) उभय संघांतील पहिला वनडे सामना भारताने 8 विकेट्स राखून नावावर केला. केएल राहुल या मालिकेत भारताचे नेतृत्व करत आहेत. तसेच यष्टीरक्षक खेळडू म्हणून देखील राहुल या सामन्यात दिसला. उभय संघांतील हा पहिला सामना सुरू होण्याआधी राहिलने कसोटी मालिकेविषयी एक इच्छा बोलून दाखवली होती.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळायच्या आहेत. उभय संघांतील टी-20 मालिका 1-1 असा बरोबरीवर सुटली. रविवारी सुरू झालेल्या वनडे मालिकेत भारताने 0-1 अशी आघाडी घेतली आहे. रविवारीच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलने केलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपल्याला खास संधी मिळाली, तर आनंद होईल, असे राहुल यावेळी म्हणाला. वनडे मालिकेत राहुल मध्यक्रमात खेळत असून यष्टीरक्षकाची भूमिका देखील पार पाडत आहे. ‘कसोटी मालिकेत देखील यष्टीरक्षक म्हणून खेळायला आवडेल’, असे राहुल म्हणाला.
💬 💬 “I will be wicketkeeping & batting in the middle order. I would be happy to take up that role even in the Test matches.”
KL Rahul, who is captaining #TeamIndia in the #SAvIND ODIs, takes us through his thoughts on his batting position across formats. @klrahul pic.twitter.com/EAnYQTEsc6
— BCCI (@BCCI) December 16, 2023
असे असले तरी, कसोटी मालिकेत राहुलला यष्टीरक्षक म्हणून खेळता येईल, असी शक्यता दिसत नाही. या मालिकेसाठी ईशान किशन याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले गेले होते. पण रविवारी किशने वैयक्तिक कारणास्तव या मालिकेतून माघार घेतली. त्याच्या जागी केएस भरत याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले गेले आहे. अशात प्रत्यक्ष प्लेइंग इलेव्हन निवडताना यष्टीरक्षकाची जबाबदारी कोणत्या फलंदाजावर सोपवली जाणार, हे पाहण्यासारखे असेल.
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह अशा दिग्गजांचे कसोटी मालिकेसाठी संघात पुनरागमन होणार आहे. पहिला कसोटी सामना बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबर रोजी सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । मुंबई इंडियन्ससह ‘हे’ चार संघांचे कर्णधार बनदलणार, पाहा सर्व 10 कर्णधारांची यादी
आयपीएलमधल्या ‘या’ संघाने रोहितमध्ये दाखवली होती रुची, एका गोष्टीमुळे फिसकटली डील