गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत सामना जिंकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. पहिल्या दिवशी सर्वच गोष्टी भारतीय संघाच्या बाजूने घडल्या. मात्र, अपवाद केवळ उपकर्णधार व सलामीवीर केएल राहुल याचा ठरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अपयशी ठरत असलेल्या राहुल याला पहिल्या डावातही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात केवळ 177 धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार केएल राहुल ही जोडी मैदानावर आली. रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. मात्र, राहुल दुसऱ्या बाजूने संघर्ष करताना दिसला. एकीकडे रोहितने केवळ 66 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले. परंतु दुसरीकडे राहुल धावांसाठी झगडत होता. दिवसाचा खेळ संपण्यासाठी केवळ सात चेंडू शिल्लक असताना तो 71 चेंडूंवर 20 धावा करून माघारी परतला.
राहुल सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कमालीचा अपयशी ठरत आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये देखील फारशी वेगळी त्याची कामगिरी राहिली नाही. मागील दहा कसोटी डावात तो केवळ एक अर्धशतक झळकावू शकला आहे. त्यामुळे दुसऱ्या डावातही तो धावा करू न शकल्यास त्याला संघाबाहेर देखील केले जाऊ शकते.
या सामन्यासाठी राहुलला संधी देणार की सध्या अप्रतिम फॉर्म मध्ये असलेल्या शुबमन गिलची संघात जागा बनणार, असा प्रश्न अनेक जण विचारत होते. मात्र, गिलला डावलून राहुलला संधी मिळाली. गिल व्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेट गाजवून पृथ्वी शॉ हा देखील कसोटी संघासाठी दावेदारी ठोकत आहे. त्यामुळे आता राहुलवर आपली कामगिरी उंचावण्याचा दबाव असेल.
(KL Rahul Fail Again Just One Fifty In Last 10 Innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन पाहून संतापला स्टीव्ह वॉ, म्हणाला, “निवडसमितीचे डोके…”
नाद करा पण अश्विनचा कुठं! 300 असो किंवा 450, भारताकडून त्यानेच घेतल्यात सर्वात जलद विकेट्स