KL Rahul Reply To Critics: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर शतक झळकावण्याचा पराक्रम केएल राहुल याने केला. राहुलच्या शतकामुळे भारतीय संघ समाधानकारक धावसंख्या गाठू शकला. मात्र, भारताला या सुस्थितीत पोहोचवल्यानंतर राहुलने त्याच्याविषयी चाहत्यांच्या मनात झालेल्या बदलाविषयी मोठे विधान केले. त्याने म्हटले की, काही महिन्यांपूर्वी हेच ते लोक होते, जे मला शिवीगाळ करत होते, आता तेच टाळ्या वाजवत आहेत.
काय म्हणाला राहुल?
केएल राहुल (KL Rahul) याने भारताच्या पहिल्या डावात 137 चेंडूंचा सामना करताना 101 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 14 चौकारांचाही समावेश होता. शतक ठोकल्यानंतर मुलाखतीत बोलताना म्हटले की, लोकांच्या मतांमध्ये अलीकडचा बदल खेळाचा भाग आहे, पण तो ही गोष्ट नाकारणार नाही की, याचा त्याच्यावर प्रभावही पडतो. त्याने यावरही जोर दिला की, अशा गोष्टींपासून दूर राहणे खेळासाठी खूपच चांगले आहे.
राहुल म्हणाला की, “आज मी शतक केलंय, तर लोकं माझं कौतुक करतायेत. 3-4 महिन्यांपूर्वी सर्वजण मला शिव्या घालत होते. हा खेळाचा भाग आहे, पण मी असे म्हणणार नाही की, याने तुमच्यावर परिणाम होत नाही. खरंच होतो. तुम्हाला लवकरच समजते की, यापासून दूर राहणेच तुमच्या खेळासाठी सर्वात चांगले आहे.”
KL Rahul said, "today I've scored a hundred so people are singing praises. 3-4 months ago, everybody was abusing me. It's part of the game, but I can't say it doesn't affect you. It does. The sooner you realise that staying away from it is good for your game the better it is". pic.twitter.com/mYV6XvTtqj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2023
खराब फॉर्म आव्हानात्मक
खरं तर, राहुलला खराब फॉर्ममुळे आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागला होता. त्याने सोशल मीडियावर जोरदार टीकेचा सामनाही केला होता. भारतीय संघातील त्याचे पुनरागमन आणि खासकरून विश्वचषकातील त्याच्या प्रदर्शनाने अनेकांची बोलती बंद केली. आता कसोटी क्रिकेटमध्ये मजबूत प्रदर्शन करत राहुलने आपण दमदार फॉर्ममध्ये परतल्याची पुष्टी केली आहे.
राहुलचे हे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2021 बॉक्सिंग डेनंतर आले आहे. त्यामुळे तो बॉक्सिंग डे कसोटीत लागोपाठ शतके करणारा जगातील फक्त दुसरा खेळाडू बनला आहे. त्याव्यतिरिक्त सेंच्युरियनमध्ये परदेशी फलंदाजाने सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीतही त्याने अव्वलस्थान पटकावले आहे. राहुलचे अलीकडील प्रदर्शन त्याची मानसिकता आणि मजबूत पुनरागमन करण्याची क्षमता दाखवून देते. त्यामुळे तो भारतीय संघाचा एक मुख्य खेळाडू बनला आहे. आता दुसऱ्या डावातही राहुलकडून संघाला अशाच खेळीची अपेक्षा असेल. (kl rahul gave a befitting reply to the critics after scoring a century against south africa in centurion test 2023)
हेही वाचा-
हे प्रभू, हे हरिराम…! लिफ्टमध्ये अडकलेले थर्ड अंपायर, सामनाही थांबवला; वॉर्नरही रोखू शकला नाही हसू; Video
Video: सामना भारत-आफ्रिकेचा, पण मैफील लुटली RCBच्या चाहत्याने; थेट किंग कोहलीकडून जर्सीवर घेतला Autograph