आयपीएल ही सर्वात मोठी टी२० लीग सुरू होण्यास काही काळ उरला आहे. २६ मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये पहिला सामना पार पडणार आहे. सर्व संघ सध्या आयपीएलच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. यावर्षीच्या हंगामात लखनऊ आणि गुजरात या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. लखनऊ संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुल तर गुजरात संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी राहुल पंजाब संघाचा कर्णधार होता, परंतु लिलावापुर्वी त्याने पंजाब संघ सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला संघ सोडण्याबाबत विचारल्या जात असलेल्या प्रश्नांवर त्याने आता उत्तर दिले आहे.
आयपीएल मेगा लिलावापुर्वी (IPL 2022 Mega Auction) सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. पंजाब संघाने सर्वात कमी खेळाडूंना संघात रिटेन केले होते. संघाने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंगला संघात रिटेन केले होते. सलग ४ हंगामांत संघासाठी ५०० हून अधिक धावा करणाऱ्या केएल राहुलला (KL Rahul) संघाने रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता. संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले की, राहुलला आम्हाला संघात कायम ठेवायचे होते. परंतु त्याने स्वत:च संघातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
यावर लखनऊ संघाचा कर्णधार म्हणाला, त्याच्यासाठी हा निर्णय घेणे खुप कठिण होते. परंतु त्याला पहायचे होते की त्याच्या नशीबात काय आहे? तो म्हणाला की, “मी पंजाब संघासोबत ४ वर्ष खेळलो आहे. या दरम्यानचा माझा काळ शानदार होता. मला फक्त हे पाहायचे होते की माझ्या नशीबात काय आहे. हा निश्चितपणे कठिण निर्णय होता. मी खुप काळ पंजाब संघासोबत होतो. परंतु मला पाहायचे होते की मी काही वेगळे करु शकतो का?”
केएल राहुलला आगामी हंगामात लखनऊ संघाने खरेदी केले आहे आणि संघाचा कर्णधार सुद्धा बनवले. हा संघ आपला पहिलाच हंगाम खेळणार आहे. लखनऊ आयपीएल इतिहासातील सर्वात महागडी फ्रॅंचायझी आहे. केएल राहुलशिवाय संघात रवि बिश्नोई आणि मार्कस स्टाॅयनिस सुद्धा खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: टी नटराजनचा पुन्हा दिसला तिखट अंदाज, वेगवान चेंडूने स्टंपचे केले दोन तुकडे
आयपीएलमधील ‘या’ पराक्रमांमध्ये गेलच ‘बॉस’, गेल्या ९ वर्षांपासून अबाधित आहेत विक्रम
आता बंधन नव्हे तर मोकळीक वाटणार! मुंबई इंडियन्सने तयार केलाय १३ हजार चौरस मीटरचा बायो-बबल