इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League 2025) मेगा लिलावात (IPL Mega Auction) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 14 कोटी रुपयांची बोली लावून केएल राहुलला (KL Rahul) आपल्या ताफ्यात सामील केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) केएल राहुलसाठी लिलावात बोली लावली, परंतु दिल्ली संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केले.
शेवटच्या आयपीएल हंगामात केएल राहुल (KL Rahul) हा लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार होता, पण त्याच्या फ्रँचायझीने त्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत केएल राहुल आता आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून (DC) खेळता दिसणार आहे.
केएल राहुलने 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) आयपीएलमध्ये पदार्पण केले. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या या सामन्यात केएल राहुलने फलंदाजी केली नाही. आयपीएलचा पदार्पण हंगाम राहुलसाठी काही खास नव्हता. या हंगामात त्याला केवळ 5 सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याला केवळ 20 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
युझवेंद्र चहल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा भारतीय स्पिनर! या संघानं लावली 18 कोटींची बोली
रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! अवघ्या काही मिनिटांत मोडला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड
मेगा लिलावात अर्शदीप सिंगवर पैशांचा वर्षाव! या टीमनं लावली तब्बल 18 कोटींची बोली