---Advertisement---

धमाकेदार कमबॅक! दुखापतीनंतर परतणाऱ्या राहुलने पाकिस्तानसमोर ठोकलं अर्धशतक

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 5:36 PM
KL Rahul
---Advertisement---

सोमवारी (11 सप्टेंबर) अखेर केएल राहुल याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले, ते देखील अगदी जोरात. भारत आणि पाकिस्तान संघ या सामन्यात खेळत असून केएल राहुल याने वनडे कारकिर्दीतील 14वे अर्धशतक ठोकले. अवघ्या 60 चेंडूंमध्ये त्याने 50 धावा कुटल्या. पाच महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या राहुलचा फॉर्म पाहून चाहते आणि सहकारी खेळाडूही आनंदात दिसले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या धुवाधार खेळीनंतर गौतम गंभीरची टीका, दाखवून दिली कमी
VIDEO: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा कौतुकास्पद निर्णय! कुटुंबीयांनीच जाहीर केली वर्ल्डकप टीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---