भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड यांच्यानंतर आता न्यूझीलंडने देखील वनडे विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला असून, केन विलियम्सन हाच संघाचे नेतृत्व करेल. मात्र, संघाची घोषणा करताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा मान खेळाडूंच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांना दिला. खेळाडूंच्या पत्नी, मुले अथवा आई यांनी खेळाडूंची नावे जाहीर केली.
सोमवारी न्यूझीलंड संघाची घोषणा विश्वचषकासाठी केली गेली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली. मात्र, या व्हिडिओमध्ये खेळाडूंच्या पत्नी, मैत्रिणी, मुले अथवा आई दिसून येत होत्या. त्या खेळाडूंची वनडे कॅप नंबर व नाव सांगत. या व्हिडिओमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याची पत्नी व दोन्ही मुले दिसत आहेत. तर, टीम साऊदीची मुले व घरातील पाळीव श्वान दिसून येते. जिमी निशाम याच्या आजीने त्याचे नाव जाहीर केले. तर, इतर खेळाडूंची देखील मुलांनी व पत्नी यांनी अशाच प्रकारे नावे घोषित केली.
न्यूझीलंड संघ मागील दोन वनडे विश्वचषकात शानदार कामगिरी करताना दिसला. 2015 वनडे विश्वचषकात त्यांना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. तर, 2019 वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सुपर ओव्हरमध्ये त्यांना इंग्लडकडून पराभूत व्हावे लागलेले.
विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ:
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम लॅथम (उपकर्णधार), डेवॉन कॉनवे, मायकल चॅपमन, डेरिल मिचेल, विल यंग, ग्लेन फिलिप्स, जिमि निशाम, रचिन रवींद्र, मिचेल सॅंटनर, ईश सोढी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी.
(Newzealand Cricket Board Great Gesture Players Team Memebers Announced Teams)
महत्वाच्या बातम्या –
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
आशिया कपमध्ये पाऊस आणि ट्रोल होतायेत जय शाह! काय आहे कारण?