आयसीसीने बुधवारी टी-२० खेळाडूंची सुधारित क्रमवारी (icc mes’s t20 ranking) जाहीर केली. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (kl rahul) याला एका स्थानाचा फायदा झाला आहे आणि तो टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या डेविड मलानला नुकसान झाल्यामुळे राहुल एका स्थानाने वर सरकला आहे. पाकिस्ताचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे १० आणि ११ क्रमांकावर आहेत.
भारतीय संघाने त्यांचा शेवटचा टी-२० सामना मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खेळला होता. टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार २० व्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर एका क्रमांकाने खाली घसरला आहे. जसप्रीत बुमराह दोन क्रमांकाने खाली घसरला आहे आणि २६ व्या क्रमांकावर आहे. अष्टपैलूंच्या यादीत एकही भारतीय खेळाडूचा समावेश नाहीय.
काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीज संघ १७ धावांनी विजयी झाला. या विजयात महत्वाची भूमिका पार पाडणारा फिरकी गोलंदाज अकील हुसेन आणि वेगवान गोलंदाज जेसन होल्डर यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. या दोन्ही गोलंदाजांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट क्रमवारी गाठली आहे. अकीलने १५ स्थानांची झेप घेत १८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने शेवटच्या सामन्यात ३० धावा खर्च करून चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. होल्डरने अंतिम सामन्यात २७ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर होल्डर २३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. होल्डरने तीन सामन्यांच्या मालिकेत ९ विकेट्स घेतल्या, तर अकिलने मालिकेत ६ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली तीन स्थानांच्या फायद्यासह ३२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. लियाम लिविंगस्टोन ३३ स्थानांनी मोठी झेप घेऊन ६८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या यादीत निकोलस पूरन आठ स्थानांच्या फायद्यासह १८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण ११३ धावा केल्या. ब्रेंडन किंग २५ स्थानांच्या फायद्यासह ५८ व्या क्रमांकावर पोहचला आहे, तर वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड १५ स्थानांच्या फायद्यासह ६० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलूंच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत फ्रँचायझी, ईशान किशनसह ‘या’ विकेटकिपर्सची लिलावात होणार चांदी!
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाशी संबंधित १० मुद्दे, जे आहेत अत्यंत महत्त्वाचे
‘रोहितसेने’तून बाहेर असलेल्या अश्विनचा अनोखा प्रयोग, एका हाताने फलंदाजीचा करतोय सराव- Video