भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने सांघिक कामगिरी करत 5 विकेट्सने सामना खिशात घातला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयात केएल राहुल याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने नाबाद अर्धशतक करत संघाचा विजय साकार केला. यासोबतच त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा एक विक्रम देखील मोडीत काढला.
विजयासाठी मिळालेल्या 189 धावांचे आव्हान मिळालेल्या भारतीय संघाची अवस्था एकवेळ 4 बाद 46 अशी झाली होती. त्यावेळी राहुलने संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 91 चेंडूवर 7 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 75 धावा केल्या.
या खेळीसह राहुलने वनडेत पाचव्या अथवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना 500 पेक्षा जास्त धावा करताना सर्वोत्तम सरासरी राखली. राहुलने आतापर्यंत 57.23 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी 47.20 अशा सरासरीसह आहे. यानंतर राहुल द्रविड व केदार जाधव यांचा क्रमांक लागतो. त्यांनी अनुक्रमे 45.18 व 44.22 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.
या सामन्याचा विचार केल्यास प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर रोखले. मिचेल मार्शने 81 धावांची आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलिया साठी सर्वाधिक योगदान दिले. भारतासाठी शमी व सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. त्यानंतर भारतीय संघ या धावांचा पाठलाग करताना अडचणीत सापडला होता. मात्र, केएल राहुल व रविंद्र जडेजा यांनी शतकी भागीदारी करत विजय साकार केला.
(KL Rahul Have Best Average In ODI At Playing Five Or Below Number)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या आणि वनडे समीकरण जुळेना! ‘गोल्डन डक’ होत पदरी पडले आणखी एक अपयश
गिलक्रिस्ट नाही, हाच भारतीय जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, खुद्द ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा खुलासा