मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील चौथा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन नव्या संघात पार पडला. या सामन्यात गुजरातने ५ विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. असे असले तरी, लखनऊचा २२ वर्षीय आयुष बदोनी याने सर्वांचे लक्ष वेधणारी कामगिरी केली. ज्यामुळे लखनऊचा कर्णधार केएल राहुलने देखील त्याचे कौतुक केले आहे.
गुजरात आणि लखनऊ ( यांच्यातील सामना सोमवारी (२८ मार्च) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच योग्य ठरवला. लखनऊने २९ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी केली. मात्र, त्यानंतर दिपक हुडा आणि आयुष बदोनीने संघाचा डाव सावरला आणि संघाला १५८ धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
दिपक आणि आयुष या दोघांनी ८७ धावांची भागीदारी रचली. दिपक ५५ धावांवर बाद झाला. त्यानंतर आयुषने कृणाल पंड्यासह ४० धावांची भागीदारी करताना अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४१ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. या खेळीदरम्यान त्याने चहूबाजूंनी फचकेबाजी केली. विशेष म्हणजे बदोनीचा हा पदार्पणाचा आयपीएल सामना होता.
त्याच्या फटकेबाजीवर लखनऊचा कर्णधार केएल राहुल खूश झाला असून तो म्हणाला आहे की, बदोनी भविष्यातील एबी डिविलियर्स आहे.
केएल राहुल सामन्यानंतर म्हणाला, ‘तो (आयुष बदोनी) बेबी एबी (Baby AB) आहे. तो पहिल्या दिवसापासून शानदार खेळत आहे. एक उदोयोन्मुख खेळाडू म्हणून तो एक जबरदस्त खेळाडू असून ३६० ड्रिग्री फटके खेळू शकतो, मी त्याच्यासाठी खूश आहे की, त्याने संधीचा फायदा घेतला. तो जेव्हा फलंदाजीसाठी गेला, तेव्हा परिस्थिती योग्य नव्हती. आमच्या ४ विकेट्स गेल्या होत्या. पण त्याने दबावात चांगली कामगिरी केली आणि आशा आहे, की तो पुढेही अशीच चांगली कामगिरी करत राहिल.’
गुजराजने जिंकला सामना
या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५८ धावा केल्या होत्या आणि गुजरातला १५९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १९.४ षटकात ५ बाद १६१ धावा करत पूर्ण केला आणि सामना ५ विकेट्सने जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तेवतिया म्हणजे क्रांती, समोरच्या टीममध्ये अशांती’, मॅचविनरचे कौतुक करताना ‘हा’ दिग्गज बनला कवी
‘हात सोडू नको, साथ सोडू नकोस,’ अक्षर पटेलची ललितला साद
परफेक्ट ‘टी२० पॅकेज’ असलेला अभिनव मनोहर, ज्याने हार्दिकच्या गुजरातला जिंकून दिली पहिलीच आयपीएल मॅच