KL Rahul Century: जिथं भारतीय संघाचा मॅटर मोठा असतो, तिथं केएल राहुल नावाचा धुरंधर उभा असतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीतही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावरील कठीण खेळपट्टीवर पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात राहुलने शतक झळकावले. त्याचे हे शतक संघासाठी खूपच महत्त्वाचे आहे.
राहुलचे शानदार शतक
भारतीय संघाची धावसंख्या जेव्हा 4 विकेट्स गमावत 92 होती, तेव्हा केएल राहुल (KL Rahul) सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरला होता. एका बाजूने विकेट्स पडत असताना राहुलने डाव सावरला. त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 70 धावा करत भारतीय संघाला 200 धावांच्या पार नेले. यावेळी भारताने 8 बाद 208 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या दिवशीही राहुलने आपली शानदार फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने यादरम्यान 133 वा चेंडू खेळताना गेराल्ड कोएट्जीला खणखणीत षटकार खेचत 101 धावांची शतकी खेळी साकारली. यामध्ये 4 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता. हे त्याचे कसोटीतील 8वे शतक ठरले. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 17वे शतक ठरले.
HUNDRED FOR KL RAHUL. 🫡
India 107 for 5, in big big trouble, returning into the Test team, taking the Keeping role and he smashed a brilliant hundred while batting with lower order & tailenders – one of the most memorable knocks by an Indian in South Africa. 🔥 pic.twitter.com/Xwkn8fUCdk
— Johns. (@CricCrazyJohns) December 27, 2023
राहुलची कसोटी कारकीर्द
भारताचा 31 वर्षीय फलंदाज राहुलने सन 2014मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याने आफ्रिकेविरुद्ध भिडण्यापूर्वी कसोटीत एकूण 47 सामने खेळले असून त्यातील 81 डावात 2642 धावांचा पाऊस पाडला आहे. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 7 शतके आणि 13 अर्धशतकांचाही पाऊस पडला आहे. 199 ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
कसोटीत पहिल्यांदाच करणार यष्टीरक्षण
विशेष म्हणजे, केएल राहुल याच्यावर हा इशान किशन आणि रिषभ पंत यांच्या अनुपस्थितीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुल कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच यष्टीरक्षण करताना दिसणार आहे. त्याने यापूर्वी वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी यष्टीरक्षकाची जबाबदारी लीलया पार पाडली आहे. (kl rahul hit century against south africa in centurion ind vs sa 1st test)
हेही वाचा-
‘समालोचकांनी प्लेयर ऑफ द मॅच निवडला नाही पाहिजे…’, गंभीरच्या विधानाने वेधले क्रिकेट विश्वाचे लक्ष
मोठी बातमी: हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून Ruled Out! पण IPL 2024 साठी उपलब्ध