Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुलने वाढदिवसापूर्वीच गर्लफ्रेंडला दिले खास गिफ्ट, झळकावली 2022 टी20 विश्वचषकातील पहिली फिफ्टी

राहुलने वाढदिवसापूर्वीच गर्लफ्रेंडला दिले खास गिफ्ट, झळकावली 2022 टी20 विश्वचषकातील पहिली फिफ्टी

November 2, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
KL-Rahul

Photo Courtesy: Instagram/ICC


भारतीय संघाने बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील चौथा सामना खेळला. ऍडलेडच्या मैदानावर झालेल्या या विश्वचषकातील 35वा सामन्यात भारतीय सलामीवीर केएल राहुल याला सूर गवसला. विशेष म्हणजे, पहिल्या तीन सामन्यात राहुलने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र, या सामन्यातील आपल्या अफलातून खेळीने त्याने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.

केएल राहुलचे अर्धशतक
या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हासन (Shakib Al Hasan) याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला खास कामगिरी करता आली नाही. तो फक्त 2 धावांवर तंबूत परतला. मात्र, खेळपट्टीवर अजूनही एक सलामीवीर बाकी होता. तो म्हणजे, केएल राहुल (KL Rahul) होय. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांना सुट्टीच दिली नाही. त्याने तडाखेबंद फटकेबाजी करत 11 धावांवर 1 बाद असणाऱ्या भारताची धावसंख्या 78 धावांपर्यंत पोहोचवली.

KL Rahul falls immediately after bringing up his half-century 👏#T20WorldCup | #INDvBAN | 📝: https://t.co/L9hgSeL5Z0 pic.twitter.com/CNoSVzTNLK

— ICC (@ICC) November 2, 2022

यावेळी राहुलने 32 धावांमध्ये 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 4 षटकार चोपले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 156.25 इतका होता. राहुलची या विश्वचषकातील ही सर्वोत्तम खेळी होती. विशेष म्हणजे, येत्या 3 दिवसांनी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी राहुलची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty Birthday) हिचा वाढदिवस आहे. या वाढदिवसापूर्वीच राहुलने ही अर्धशतकी खेळी करत अथियाला वाढदिवसाची एकप्रकारे भेटच दिली.

राहुलचे यापूर्वीचे 3 सामने
केएल राहुल याने यापूर्वी खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. मेलबर्न येथे खेळलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो फक्त 4 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही त्याला सूर गवसला नव्हता. त्याने सिडनीच्या या सामन्यात फक्त 9 धावा केल्या होत्या. पुढे तिसऱ्या सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने पर्थ येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही 9 धावांचीच खेळी केली होती.

भारतीय संघाची टी20 विश्वचषकातील कामगिरी
टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत बांगलादेशपूर्वी 3 सामने खेळले. भारताने त्यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्सला 56 धावांनी धूळ चारली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताला विश्वचषकातील पहिला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारताला 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका चेंडूने बनवले व्हिलन एकाने हिरो! जीवदान मिळाल्यावर दोन चेंडूच टिकू शकला रोहित
बांगलादेश बनला टॉसचा बॉस! टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण; संघात महत्त्वपूर्ण बदल


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

पुन्हा एकदा विराटची 'राजेशाही' खेळी! टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 185 धावांचे आव्हान

Sikandar Raza

सिकंदर रजाच्या षटकारावर आयसीसीही फिदा! व्हिडिओ शेअर करत लिहिले...

Shakib-Al-Hasan-And-Virat-Kohli

बडा याराना लगता है! विराटने पंचांकडे नो-बॉलची मागणी करताच शाकिबने मारली मिठी, व्हिडिओ व्हायरल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143