इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये रविवारी (१८ एप्रिल) पहिल्यांदा एकाच दिवशी दोन सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार व ‘बर्थडे बॉय’ केएल राहुलने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक ठोकले. यासह राहुलने आपला २९ वा वाढदिवस दणक्यात साजरा केला.
राहुलचे संयमी अर्धशतक
नाणेफेक गमावल्यानंतर पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार केएल राहुल व मयंक अगरवाल यांनी संघाला तुफानी सुरुवात देत १३ षटकात १२२ धावा तडकावल्या. मयंक अगरवाल आक्रमक ६९ धावा काढून परतल्यानंतर राहुलनेही स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा बनविल्या. राहुलने राजस्थान रॉयल्स विरुद्धही ९१ धावांची खेळी केली होती.
वाढदिवशी केलेली दुसरी सर्वोत्तम खेळी
केएल राहुल रविवारी आपला २९ वा वाढदिवस साजरा करत होता. त्याने या दिवसाचे शानदार सेलिब्रेशन करत अर्धशतक झळकावले. यासह राहुल आपल्या वाढदिवशी आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला.
ढदिवशी आयपीएलमध्ये सामना खेळताना सर्वोत्तम खेळी करण्याचा मान सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडे जातो. वॉर्नरने मागील आयपीएल हंगामात २७ ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्सच विरुद्ध खेळताना ६६ धावांची खेळी केली होती. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्सचा माजी सलामीवीर माईक हसी आहे. त्याने, २७ मे २०१२ रोजी वाढदिवसाच्या दिवशी केकेआर विरुद्धच्या सामन्यात ५४ धावा बनवल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
लाजवाब राहुल! अर्धशतक ठोकताच आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा बनला पहिला फलंदाज
‘उडता डॅनियल!’ बदली फिल्डर म्हणून आलेल्या ख्रिस्टियनने घेतला शुभमन गिलचा घेतला लाजवाब
आश्चर्यम! चौदा वर्षात आरसीबीने पहिल्यांदा केली ‘अशी’ कामगिरी