जोहान्सबर्गच्या द वॉन्डरर्स स्टेडियमवर गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. ३ जानेवारीपासून या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारताने ५८ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या सामन्यात साजेशी खेळी करू शकलेला नाही.
पहिल्या डावातील अर्धशतकानंतर दुसऱ्या डावात तो केवळ ८ धावांवर पव्हेलियनला परतला. स्वस्तात आपली विकेट गेल्याने त्याचा स्वत:वरील संयमही सुटला (KL Rahul Get Angry) आणि त्याचे प्रतिस्पर्धी खेळाडूंशी वाग्युद्ध झाल्याचे (KL Rahul Exchange Words) दृश्य मैदानावर पाहायला झाले.
तर झाले असे की, ८ धावांवर खेळत असलेल्या राहुलने सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर सेकंड स्लिपमध्ये शॉट मारला. त्यावेळी सेकंड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या ऍडम मार्करमने डाईव्ह मारत त्याचा झेल टिपला. परंतु राहुलला आपण झेलबाद झाल्याचे खरे न वाटल्याने तो काही वेळ मैदानावरच उभा राहिला. हे पाहून मैदानी पंचांनी सॉफ्ट सिग्नलद्वारे त्याची विकेट तपासली. यामध्ये मार्करमने अगदी अचूक हा झेल पकडल्याचे दिसले. त्यामुळे पंचांनी राहुलला झेलबाद करार केले.
आपल्याला बाद दिल्याचे पाहून कर्णधार राहुल मात्र खूप नाराज झाला. आपली ही नाराजी त्याने दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंवर काढली. राहुल स्वस्तात बाद झाल्याचा जल्लोष विरोधी संघातील खेळाडू एकत्र जमून करत होते. यावेळी पव्हेलियनला परतत असलेला राहुल दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील खेळाडूंशी काहीतरी बोलताना दिसला. हे पाहून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार यानेही त्याला प्रत्युत्तर दिले. काही मिनिट त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाची सुरू राहिली आणि अखेर राहुल पव्हेलियनला परतला.
https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1478383367615885317?s=20
त्यांच्यातील या वादाचा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेहमी शांत दिसणाऱ्या राहुलला अशाप्रकारे चिडताना पाहून भारतीय चाहते मात्र चकित होताना दिसत आहेत.
दरम्यान केवळ राहुलच नव्हे तर भारताच्या इतर फलंदाजांनीही या सामन्यात विशेष प्रदर्शन करता आलेले नाही. पहिल्या डावात भारताकडून फक्त राहुल एकटा ५० धावांचा आकडा गाठू शकला होता. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! कोरोनापुढे बीसीसीआयने टेकले गुडघे, रणजी ट्रॉफीसह ‘या’ २ देशांतर्गत स्पर्धा केल्या स्थगित
‘पालघर एक्सप्रेस’ सुसाट! सात बळी मिळवत जोहान्सबर्गमध्ये गाजवली सत्ता
हेही पाहा-