---Advertisement---

केएल राहुल अंतिम सामन्यातून बाहेर, प्रशिक्षक गंभीर कोणाला देणार संघात स्थान?

On: शनिवार, मार्च 8, 2025 2:58 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आणि न्यूझीलंड अंतिम सामन्यात दाखल झाले आहेत. अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) संघात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकाही सामन्यात पराभव पत्करला नाही. कोणताही सामना न हरता भारतीय संघ अंतिम सामन्यांमध्ये पोहोचला आहे.

अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला काही गोष्टी कडे लक्ष देऊन त्या सुधाराव्या लागतील. नाहीतर अंतिम सामना हातातून जाऊ शकतो. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुलला (KL Rahul)  संघातून बाहेर पडावे लागू शकते. त्याच्या जागी प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) या खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी देऊ शकतात.

के एल राहुलने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आत्तापर्यंत फलंदाजी चांगली केली आहे. पण विकेट कीपिंग तो चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याच्याकडून सातत्याने स्टंपिंग आणि चेंडू सुटत आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी संघ ही जोखीम घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या जागी संघात रिषभ पंतला (Rishbh Pant) संधी देण्यात येऊ शकते.

दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी सहाय्य करणारी आहे. तसेच विकेट कीपिंग करताना येथे अडचण निर्माण होते. भारतीय संघाकडे 4 शानदार असे फिरकीपटू आहेत. तसेच उद्याच्या अंतिम सामन्यात विकेटकीपिंग कडे लक्ष द्यावे लागेल. कदाचित यामुळेही केएल राहुलच्या जागी अंतिम सामन्यात रिषभ पंतला संधी देण्यात येऊ शकते.

रिषभ पंत राहुलच्या तुलनेत खूप चांगला यष्टीरक्षक आहे. त्याने भारतीय क्रिकेट सामन्यांमध्ये विकेट कीपिंग केली आहे, त्यामुळेच त्याला माहिती आहे की स्पिन कंडिशन मध्ये कशाप्रकारे कीपिंग केली जाते. रिषभच्या संघात येण्यामुळे भारतीय संघाला एक चांगला यष्टीरक्षक तसेच फलंदाजही मिळू शकतो. रिषभ पंतची ही पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा असणार आहे, ज्यामध्ये तो पदार्पण करू शकतो. याआधी त्याने वर्ल्डकप आणि टी20 वर्ल्ड कप मध्ये पदार्पण केले आहे.

रिषभ पंत भारतीय संघात आल्यामुळे संघाला त्याचा फायदा होऊ शकतो. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात रिषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Champions Trophy: सचिन की विराट..! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणाची कामगिरी सरस?

टीम इंडियाच्या पुढील नेतृत्वासाठी या खेळाडूंमध्ये चुरस!

बुमराहच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह, आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---