लंडन। इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आज (11 सप्टेंबर) भारताकडून सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे.
भारताने या सामन्याच्या पाचव्या दिवशी (11 सप्टेंबर) पहिल्या सत्रात 5 बाद 167 धावा केल्या असून राहुल 126 चेंडूत 108 धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच त्याला खेळपट्टीवर दुसऱ्या बाजूने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत(12*) साथ देत आहे.
हे राहुलचे कसोटी कारकिर्दीतील पाचवे कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे त्याने ही पाचही शतके वेगवेगळ्या देशात केली आहेत. पहिली पाच कसोटी शतके वेगवेगळ्या देशात करणारा तो भारताचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी अजिंक्य रहाणेने असा पराक्रम केला आहे.
राहुलने त्याचे पहिले कसोटी शतक आॅस्ट्रेलिया विरुद्ध सिडनीमध्ये केले होते. तर त्यानंतर त्याने अनुक्रमे श्रीलंका, कॅरेबियन बेटे(विंडिज), भारत आणि इंग्लंड या देशात कसोटी शतके केली आहेत.
तसेच रहाणेने पहिले पाच शतके अनुक्रमे न्यूझीलंड, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, श्रीलंका आणि भारत या देशात केली होती.
पहिले पाच कसोटी शतके वेगवेळ्या देशात करणारा केएल राहुल अजिंक्य रहाणे नंतरचा दुसरा भारतीय
राहुलची शतके
110 वि. आॅस्ट्रेलिया (सिडनी)2015
108 वि. श्रीलंका (कोलंबो)2015
158 वि. विंडिज (किंग्सटन)2016
199 वि. इंग्लंड (चेन्नई)2016
101* वि इंग्लंड (द ओव्हल)2018#म #मराठी @Maha_Sports— Pranali Kodre (@Pranali_k18) September 11, 2018
याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात चौथ्या डावात शतक करणारा राहुल तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. या आधी असा पराक्रम सुनील गावस्कर आणि शिखर धवनने केला आहे. तसेच गावस्कर यांनी चार वेळा हा पराक्रम केला असून शिखरने एकदा केला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय
–Video: शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकला मिळाली ३३ बिअर बॉटल्सची भेट
–अवघ्या नऊ धावांनी कोहलीचा तो विक्रम हुकला