दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (sa vs ind odi series) बुधवारी (१९ जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना पार्लमध्ये खेळला गेला. भारताचा युवा फलंदाज केएल राहुल (Indian Captain KL Rahul) याने या सामन्यात संघाचे नेतृत्व केले. नियमीत कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्यानंतर राहुलकडे ही जबाबदारी आली. राहुलने या सामन्यासाठी मैदानात पाय ठेवताच इतिहास रचला.
दक्षिण अफ्रिका दौऱ्याआधी बीसीसीआने विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावून बाजूला केले होते. विराटनंतर ही जबाबदारी रोहित शर्मावर सोपवली गेली. परंतु नियमित कर्णधाराच्या रूपातील त्याच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा उपस्थित राहू शकला नाही. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहितला मुंबईत सराव करताना पायाला दुखापत झाली होती.
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
३८ वर्षांनंतर पुन्हा घडला इतिहास
केएल राहुलच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ३९ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी तब्बल ३८ वर्षांपूर्वी असे घडले होते, जेव्हा ५० पेक्षा कमी सामने खेळलेल्या एखाद्या खेळाडूला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले गेले होते. १९८४ मध्ये मोहिंदर अमरनाथ यांना त्याच्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
विरेंद्र सेहवाग आणि सय्यद किरमानी यांची केली बरोबरी
याचसोबत राहुलने विरेंद्र सेहवाग आणि सय्यद किरमानी यांची देखील बरोबरी केली आहे. या दोघांनी कारकिर्दीत कधीच लिस्ट ए क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व केले नव्हते आणि पुढे भारताचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती. राहुलने देखील लिस्ट ए संघाचे नेतृत्व कधीच केले नाही, पण आता त्याला भारतीय संघाच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. तसेच दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने मोठ्या काळानंतर एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. अश्विनने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना २०१७ मध्ये खेळला होता.
महत्वाच्या बातम्या –
भारताचा २६वा वनडे कर्णधार बनला केएल राहुल, पाहा आजवर झालेल्या वनडे कर्णधारांची संपू्र्ण यादी
अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर
“तर सांग कोणाची विकेट घेऊ”, युजवेंद्र चहलचा विराट कोहलीसाठी स्पेशल मेसेज
व्हिडिओ पाहा –