---Advertisement---

BREAKING: १७ कोटीत लखनऊकर झाला राहुल; स्टॉयनिस-बिश्नोई साथीला

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 10:37 PM
KL R
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) आगामी हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रॅंचाईजींचा समावेश करण्यात आला. या दोन्ही संघांना आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची (ड्राफ्ट) संधी देण्यात आली. २२ जानेवारी रोजी या दोन्ही संघांच्या प्रत्येकी तीन खेळाडू जाहीर करण्यात आले.

प्रसिद्ध भारतीय उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या लखनऊ संघाने भारतीय कर्णधार केएल राहुल, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस व युवा भारतीय लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना ड्राफ्ट केल्याचे जाहीर केले. त्यांना अनुक्रमे १७ कोटी, ९.२ कोटी व ४ कोटी अशी रक्कम करारबद्ध करण्यासाठी देण्यात आली.

फ्रॅंचाईजीचे मालक उद्योगपती संजीव गोयंका यांनी याबाबत घोषणा करताना म्हटले,
“मला राहुल, स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांच्या नावाची घोषणा करताना आनंद होत आहे. राहुल आमचा कर्णधार असेल. हे तिन्ही खेळाडू तीन वेगवेगळ्या ठिकाणी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडू शकतात. केवळ एक वर्ष नव्हे तर पुढील पाच-सहा वर्षांची योजना पाहून आम्ही या खेळाडूंची निवड केली आहे.”

गोयंका यांच्यासह संघाचा मेंटर गौतम गंभीर हा देखील या खेळाडूंची घोषणा करते वेळी हजर होता. राहुलच्या नेतृत्वात लखनऊ संघ नक्कीच उत्कृष्ट कामगिरी करेल, असा आशावाद गंभीरने व्यक्त केला. मी संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर असतील. तर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया यांची वर्णी लागली आहे. लखनऊ फ्रेंचायझींंने आपल्या संघाचे नाव ठरविण्यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांना पर्यायी मागितले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL २०२२ | अहमदाबाद, लखनौ यांच्या रिटेन्शननंतर कुणाच्या खिशात किती रक्कम शिल्लक? पाहा संघनिहाय यादी (mahasports.in)

IPL २०२२ | अहमदाबाद, लखनौ यांच्या रिटेन्शननंतर कुणाच्या खिशात किती रक्कम शिल्लक? पाहा संघनिहाय यादी (mahasports.in)

नवा डाव! कर्णधार म्हणून नवी जबाबदारी सांभाळण्यास हार्दिक सज्ज (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---