भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांची सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ 12 जानेवारीपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
यासाठी बीसीसीआय पुढील 24 तासात आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वन-डे तर न्यूझीलंड विरुद्ध पाच वन-डे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.
या मालिकांसाठी बीसीसीआयचे निवड समीती अध्यक्ष एमएसके प्रसाद संघनिवड करणार असून हा संघच आयसीसी विश्वचषक 2019 साठी कायम ठेवला जाणार आहे. यामध्ये क्वचितच बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, रिषभ पंतची संघात निवड झाली तर दिनेश कार्तिकला संघाबाहेर बसावे लागेल. प्रसाद यांनी धोनी हा विश्वचषकासाठी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल, असे याआधीच स्पष्ट केले आहे. म्हणून पंत हा एमएस धोनीसाठी पर्यायी खेळाडू असणार आहे. तर केएल राहुलचा सध्याचा फॉर्म बघता तो ही संघाबाहेर जाऊ शकतो.
पंत हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. तर कार्तिकला एशिया कपमध्ये संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर पंत हाच संघात कायम राहिला आहे.
राहुललाही सगळ्याच प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघात जागा मिळाली. मात्र तो धावा करण्यात अपयशी ठरला आहे. तर सलामीवीरांसाठी भारताकडे रोहित शर्मा आणि शिखर धवन हे पर्याय आहेत.
भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 23,26,28, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी असे पाच वनडे सामने होणार आहेत. तस 6,8 आणि 10 फेब्रुवारीला टी20 सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–बाॅक्सिंग डे टेस्टमधून टीम इंडियाचा हा शिलेदार जवळपास बाहेर
–२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?
–मेलबर्न कसोटीआधी टीम इंडियासाठी ही आहे आनंदाची बातमी
–शाहरुख म्हणतो, मला या भारतीय क्रिकेटरचा रोल करायचा आहे