IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (20 जून) पासून सुरू होणार आहे. (India vs England Test Series) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे, ज्यात कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या हाती सोपवण्यात आली असून (Shubman Gill Captain) रिषभ पंतला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. (Rishabh Pant Vice-Captain) ही मालिका 20 जूनपासून सुरू होणार असली तरी, आता भारतीय संघाचा एक वरिष्ठ खेळाडू संघातील इतर सदस्यांपेक्षा लवकर इंग्लंडला रवाना होणार आहे. (KL Rahul England Tour) हा खेळाडू दुसरा कोणी नसून केल राहुल आहे, जो 6 जूनला इंग्लंडला रवाना होणार होता.
‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार, केएल राहुल आधी 6 जूनला बाकीच्या संघासोबत इंग्लंडला रवाना होणार होता. राहुलने बीसीसीआयकडे मागणी केली होती की, त्यानला 6 जूनपासून सुरू होणाऱ्या ‘इंडिया ए’ विरुद्ध ‘इंग्लंड लायन्स’ च्या दुसऱ्या फर्स्ट-क्लास सामन्यात खेळण्याची संधी दिली जावी. त्यांची ही मागणी स्वीकारण्यात आली आहे. (India A vs England Lions)
केएल राहुल इंग्लंड दौऱ्यासाठी लवकर तयारी करू इच्छित होता, परंतु मुंबई आणि बंगळूरुमधील हवामान ठीक नसल्यामुळे त्याने लवकर जाण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला आठवत असेल की, राहुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही असेच काही केले होते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी त्याने ‘इंडिया ए’ साठी सामना खेळला होता.
‘इंडिया ए’ विरुद्ध ‘इंग्लंड लायन्स’ चा पहिला सामना (30 मे) रोजी सुरू झाला आहे. या सामन्यात कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जयस्वाल फ्लॉप ठरले, परंतु करुण नायर आणि सरफराज खान यांनी दमदार फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. दुसरा फर्स्ट-क्लास सामना 6 जूनपासून सुरू होईल, ज्यात शुबमन गिल, साई सुदर्शन आणि आता केएल राहुल देखील खेळताना दिसू शकतात.
केएल राहुलने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध 13 सामन्यांमध्ये 955 धावा केल्या आहेत. आगामी मालिकेत 45 धावा करताच तो कसोटीमध्ये इंग्लंडविरुद्ध 1,000 धावा पूर्ण करणारा 17वा भारतीय फलंदाज बनेल. त्याच्या आधी विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यासह 16 भारतीय फलंदाजांनी असे केले आहे. (KL Rahul 1000 Test Runs England)






