भारतीय संघ १६ डिसेंबरला (गुरुवार) दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी (south africa tour of india) रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा (rohit sharma) ला भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले गेले. परंतु काही दिवसांपूर्वी रोहितला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून रोहितने माघार घेतल्यानंतर आता संघाचा उपकर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशात उपकर्णधारपदासाठी काही नावांची चर्चा होत आहे.
रोहितने कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर संघाच्या उपकर्णधारपदाबाबत तेढ निर्माण झाला आहे. अजिंक्य रहाणे मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याच्याकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले होते आणि रोहितवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण आता रोहितला दुखापत झाल्यामुळे ही जबाबदारी पुन्हा रहाणेकडे येते की कोणत्या दुसऱ्या खेळाडूकडे सोपवली जाईल? हे पाहावे लागणार आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य राहणेला कर्णधार केले गेले होते आणि उपकर्णधारपद चेतेश्वर पुजाराकडे आले होते. पण पुजारा देखील सध्या खराब फॉर्ममध्ये आहे आणि अशात त्याच्याकडे उपकर्णधारपद देणे योग्य ठरणार नाही.
बीसीसीआयने रोहितला दुखापत झाल्यानंतर या कसोटी मालिकेत उपकर्णधारपद कोण स्वीकारणार, याची कसलीच माहिती दिलेली नाही. पण आता अशी माहिती समोर येत आहे की, केएल राहुलला आगामी कसोटी मालिकेत संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. केएल राहुल या शर्यतीत सर्वात पुढे आहे. तर त्याच्याव्यतिरिक्त रिषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन हे दोघेही या शर्यतीत आहेत. आता बीसीसीआय रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार कोणाला बनवणार?, हे पाहावे लागणार आहे.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेला भारताचा कसोटी संघ –
विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय खेळाडू – नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अर्जन नागवसवाला.
महत्वाच्या बातम्या –
थोडं नशीब थोडी मेहनत! ४ वर्षांनंतर स्टीव्ह स्मिथ झाला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार, ‘हे’ आहे कारण
जरा इकडे पाहा! टी२० मध्ये सहा षटकार खाणाऱ्या ब्रॉडचा कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम