ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. हा सामना ॲडीलेडच्या मैदानावर आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना गॅबाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. मालिकेत पिछाडीवर असलेला इंग्लंड संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांचे पुनरागमन झाले आहे. हा स्टुअर्ट ब्रॉडच्या कारकिर्दीतील १५० वा सामना आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे. तसेच इंग्लंड संघाच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो इंग्लंड संघातील मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १५० वा सामना आहे. यापूर्वी जेम्स अँडरसन आणि ॲलिस्टर कूकने देखील हा कारनामा केला आहे. जेम्स अँडरसनने इंग्लंड संघासाठी १६७ आणि ॲलिस्टर कूकने १६१ कसोटी सामने खेळले आहेत.
या विक्रमाच्या यादीत इंग्लंड संघ आहे अव्वल स्थानी
कसोटी क्रिकेटला १४४ वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले. परंतु, काही मोजकेच असे क्रिकेटपटू आहेत. ज्यांना १५० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंड संघातील १, २ नव्हे, तर तब्बल ३ खेळाडू आहेत, ज्यांना १५० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे सर्वाधिक खेळाडूंनी १५० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंडने अव्वल क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघाकडून ॲलेन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंगने १५० पेक्षा अधिक सामने खेळण्याचा मान मिळवला आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ असून भारतीय संघाकडून सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना १५० पेक्षा अधिक कसोटी सामन्याचा मान मिळाला आहे.
एकाच संघाकडून १५० पेक्षा अधिक सामने खेळणारे खेळाडू
३ – इंग्लंड – (जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ॲलिस्टर कुक)*
३ – ऑस्ट्रेलिया – (ॲ लेन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग)
२ – भारत – (सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड)
१ – दक्षिण आफ्रिका – (जॅक कॅलिस)
१- वेस्ट इंडिज – (शिवनारायण चंद्रपॉल)
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानचे पुन्हा हसू! माजी कर्णधारच म्हणतोय, ‘प्रेक्षक कुठे आहेत?’
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट
मोठ्या मनाचा नटराजन; स्वतःच्या गावकऱ्यांसाठी बनवतोय दर्जेदार क्रिकेट मैदान