भारतीय संघ आशिया चषक 2022 मध्ये ग्रुप स्टेजच्या दोन्ही सामन्यांमध्ये जिंकला, पण सुपर फोरमध्ये त्यांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारत अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. गुरुवारी (8 सप्टेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला असला, तरी संघ आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या केएल राहुलने खास प्रतिक्रिया दिली.
भारताने त्यांचा सुपर फोरमधील शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध मोठ्या अंतराने जिंकला. तब्बल 101 धावांच्या अंतराने अफगाणिस्तान संघ पराभूत झाला. दिग्गज विराट कोहली (Virat Kohlil) या सामन्यात 61 चेंडू खेळला आणि 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 122 कुटल्या. या वादळी खेळीचा भारताच्या विजयात मोलाचा वाटा राहिला. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळत नसल्यामुळे केएल राहुल (KL Rahul) या सामन्यात संघाचे नेतृत्व करत होता. राहुलने (41 चेंडूत 62) देखील कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. भारताने विजय मिळवून आशिया चषकाचा शेवट गोड केला असला, तरी राहुलच्या मते संघाला या स्पर्धेतून खूप काही शिकण्याची गरज आसल्याचे सांगितले.
सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला की, “परिणाम निराशाजनक आहेत. आम्हीला अंतिम सामना खेळायचा होता आणि स्वतःला आव्हान द्यायचे होते. आम्ही अंतिम सामना जिंकू इच्छित होतो, पण असे होऊ शकले नाही. तरीही आम्ही ही गोष्ट सकारात्मकतेने घेत आहोत. आम्हाला चांगले आव्हान दिले गेले आणि ही पुन्हा एकादा एकत्र बसण्याची आणि चिंतन करण्याची वेळ आहे. पराभव चांगली गोष्ट नाहीये, पण कधी-कधी तुम्हाला त्यातून जावे लागते. आमचे लक्ष टी-20 विश्वचषक आहे आणि अपेक्षा आहे की, हे धडे घेतल्यानंतर टी-20 विश्वचषकात आम्हाला मदत मिळेल.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक मावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांमध्ये भारतीय संघाच्या 2 फलंदाजांनी विकेट्स गमावल्या आणि 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 111 धावांपर्यंत मजल मरू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुढच्या मौसमात मुंबई खिलाडीज जोरदार पुनरागमन करणार – संघाचे सीईओ मधुकर श्री यांना विश्वास
गतविजेत्या पीआयएफएकडून अस्पायर एफसीचा पराभव
गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर