टी२० विश्वचषक २०२१ नंतर आता संयुक्त अरब अमिराती (युएई) आशिया चषक २०२२ चे यजमानपद भूषवणार आहे. गतवर्षी टी२० विश्वचषकात नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही नाणेफेक महत्त्वपूर्ण ठरली होती. यानंतर आता दुबईत पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. अशात दुबईत होणाऱ्या या सामन्यापूर्वी नाणेफेकीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर भारताचा उपकर्णधार केएल राहुल याने लक्षवेधी उत्तर दिले आहे.
दुबईच्या (Dubai Stadium) मैदानावर गतवर्षी झालेल्या टी२० विश्वचषकात १३ पैकी १२ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले होते. अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यातही लक्ष्याचा पाठलाग करणारा संघच जिंकला होता. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ७ बाद १५१ धावा करू शकला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १८ षटकातच भारताचे आव्हान पूर्ण करताना १० विकेट्सने हा सामना जिंकला होता.
आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2022) झालेल्या पत्रकार परिषदेत नाणेफेकीबद्दल प्रश्न विचारला गेला असता राहुल (KL Rahul) म्हणाला की, भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध टी२० विश्वचषकात पराभूत झाल्याचा धडा घेत १० महिन्यांपूर्वीच योजना आखली होती.
राहुल म्हणाला की, “मोठ्या सामन्यांमध्ये नाणेफेकीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. जर तुम्ही बारकाईने पाहिले असेल तर, टी२० विश्वचषकानंतर आम्ही जितक्या स्पर्धा खेळलो आहोत, त्यामध्ये आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आव्हान स्विकारले आहे. आशिया चषकातही आमचे हेच लक्ष्य आणि दृष्टीकोन असणार आहे. याचा सातत्याने अभ्यास केल्याने आत्मविश्वास मिळतो. तसेच हेदेखील डोक्यात राहते की, जर आपण नाणेफेक जिंकली तर प्रथम फलंदाजी निवडायची आहे.”
“आशिया चषकात आम्ही आमचे सर्वोत्कृष्ट देऊ. प्रत्येक संघ विश्वचषकासारख्या स्पर्धेची सुरुवात विजयाचे करू इच्छिते. परंतु दुर्भाग्याने गतवर्षी आमच्यासोबत असे झाले नव्हते. पाकिस्तानच्या मजबूत संघाने आम्हाला हरवले होते. त्यामुळे आता आमच्याकडे ही मोठी संधी आहे, त्यांना हरवायची. आम्ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहोत”, असेही त्याने म्हटले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘फॉर्ममध्ये परत ये आणि शतकही कर, पण आमच्याविरुद्ध नको’, विराटला खूपच घाबरलाय पाकिस्तानी गोलंदाज
‘तो फॉर्ममध्ये आला पाहिजे, पण…’, वाचा विराटविषयी काय बोलला केएल राहुल
भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे मोठे वक्तव्य, ‘या’ टीमला म्हटले फेवरेट






