---Advertisement---

सहावा गोलंदाज खेळवणार? कर्णधार राहुलने सांगितला व्यंकटेश अय्यरबाबतचा प्लॅन

v iyer
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने राजीनामा दिल्याने काही दिवस त्याचीच चर्चा झाली. आता बुधवारपासून (१९ जानेवारी) उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या पूर्वसंध्येला भारताचा नवनियुक्त कर्णधार केएल राहुल (India ODI Captain KL Rahul) हा पत्रकार परिषदेला सामोरे गेला. त्याने या पत्रकार परिषदेत पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनविषयी सूचक वक्तव्य केले. (KL Rahul Press Conference)

राहुल प्रथमच संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेच्या आधीच्या पत्रकार परिषदेत बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या मालिकेत भारतीय संघाचा सहावा गोलंदाज कोण असेल असा प्रश्न विचारल्यानंतर तो उत्तरला,
“त्यावर विचार झाला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची आवश्यकता असते. सहा गोलंदाज खेळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता संघात व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आला आहे. आम्ही त्याला ती संधी देऊ. त्याने अलिकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या काही सामन्यात आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सहावा गोलंदाज म्हणून त्याचा विचार केला जाईल.”

व्यंकटेश अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी२० सामन्यांमध्ये तीन षटके टाकली होती आणि १२ धावांत एक बळी घेतला होता. तसेच खालच्या फळीत फलंदाजीही केली होती. चेंडू कमी असताना अशा वेळी तो फलंदाजीला गेला. त्याने तीन सामन्यांत १२८.५७ च्या स्ट्राइक रेटने ३६ धावा केल्या. ही आकडेवारी पाहिल्यानंतरच संघ व्यवस्थापनाला त्याला आणखी संधी द्यायची आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने कोलकात्यासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली होती. व्यंकटेशने १० सामन्यांत ४१.११ च्या सरासरीने ३७० धावा केल्या होत्या. तसेच तीन बळी घेतलेले. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफीत तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसलेला.

पहिल्या वनडेसाठी संभाव्य भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटीचा कर्णधार झाल्यास विराटचे कोणते गुण घेऊन पुढे जाशील? केएल राहुलने सांगितले… (mahasports.in)

जोहान्सबर्गमधील पराभवानंतरही केएल राहुल करू इच्छितोय कसोटी संघाचे नेतृत्व; म्हणे, मी संघाला पुढे… (mahasports.in)

पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत पार्टी करत होता जो रूट, तितक्याच आले पोलिस अन्…, बघा व्हिडिओ (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---