---Advertisement---

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? या 2 खेळाडूंची नावं चर्चेत

On: मंगळवार, जुलै 9, 2024 9:32 AM
rohit sharma
---Advertisement---

टी20 विश्वचषक संपल्यानंतर आता भारतीय संघ आपली पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी कर्णधारपदाची चर्चा सुरू झाली आहे. कारण या मालिकेदरम्यान संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याची बातमी आहे, ज्यामध्ये नियमित कर्णधार रोहित शर्माचा समावेश आहे.

‘इनसाइड स्पोर्ट्स’नं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयनं गेल्या तीन महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत असलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: रोहित, जो डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषकापर्यंत सतत क्रिकेट खेळला आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं, या खेळाडूंची एकदिवसीय संघात निवड होण्याची खात्री आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका त्यांच्यासाठी चांगला सराव असेल. हे खेळाडू येत्या काही महिन्यांत कसोटी सामन्यांना प्राधान्य देतील कारण भारत सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान 10 कसोटी सामने खेळणार आहे.

वास्तविक, येत्या काही महिन्यांत भारताला बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने, न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत वर्कलोड मॅनेजमेंट करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं निवडकर्ते आणि वरिष्ठ खेळाडूंचं मत आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे. मात्र असं असलं तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधारपद भूषवणाऱ्या केएल राहुलकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. भारतीय क्रिकेट संघ जुलै आणि ऑगस्ट मध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे.

भारतीय संघ पहिला टी20 सामना 27 जुलै रोजी, दुसरा 28 जुलै रोजी आणि शेवटचा 30 जुलै रोजी खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे तीन टी20 सामने खेळले जातील. भारताचा श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्टला, दुसरा 4 ऑगस्टला आणि तिसरा सामना 7 ऑगस्टला खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून तीनही एकदिवसीय सामने खेळले जातील.

महत्त्वाच्या बातम्या – 

किलर यॉर्कर… बुमराह इतकाच घातक! या खतरनाक गोलंदाजाला टीम इंडियात गेल्या 3 वर्षांपासून संधी मिळत नाहीये
जय शाह आता अधिक शक्तिशाली होणार! बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाण्याच्या चर्चांना वेग
ईशान किशननं रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार का दिला होता? समोर आलं धक्कादायक कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---