---Advertisement---

दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या राहुलने गर्लफ्रेंड अथियासोबत शेअर केला ‘व्हॅलेंटाईन’, फोटो एकदा बघाच

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 11:18 PM
Athiya-Shetty-KL-Rahul
---Advertisement---

केएल राहुल (KL rahul) हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या(ind vs wi) टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. टी२० मालिकेतून बाहेर झाल्यानंतर त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तो त्याची प्रेमिका अथिया शेट्टीसोबत दिसत आहे. सोमवारी (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन डे होता. या दिवशी केएल राहुल त्याच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी गेला होता. त्याचा तो फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत राहुलने ‘हॅप्पी डे’ असे लिहिले आहे. सोबतच हार्टचा इमोजीही शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

केएल राहुलच्या जागी आता ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुड्डा यांचा संघात सामावेश करण्यात आला आहे. राहुलला ९ फेब्रुवारीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. तसेच अक्षर पटेल अजून दुखापतीतुन बरा झालेला नाही. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सुद्धा जावू शकला नव्हता. तसेच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीमुळे टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्याजागी कुलदीप यादवला संघात सामील केले गेले आहे.

टी२० मालिकेत रोहित शर्मासोबत इशान किशन सलामीची जबाबदारी संभाळू शकतो. १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडलेल्या आयपीएल लिलावाचा सर्वात महागडा खेळाडू इशान किशन ठरला आहे. त्याला रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यामुळे टी२० मालिकेत इशानवर सर्वांच्या नजरा असण्याची शक्यता आहे. आता ही मालिका कोणता संघ जिंकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/klrahul11/status/1493120403983663104?s=20&t=lrDxk4933rXazRhxmlF65w

१६ फेब्रुवारीपासुन भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामध्ये टी२० मालिका सुरु होणार आहे. कोलकत्ता येथे या मालिकेची तयारी सुरु झाली आहे. या दोन संघांमध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. ही मालिका भारताने जिंकली.

भारतीय टी२० संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.

महत्त्वाच्या बातम्या-

चुरसीच्या लढतीनंतर गुजरात जायंट्स आणि पुणेरी पलटण संघातील सामना ३१-३१ ने बरोबरीत

टीम इंडियाला नडणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाला आयसीसीकडून बक्षीस, बनला जानेवारीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर

बिग ब्रेकिंग! भारताला तिसरा धक्का, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर टी२० मालिकेतून बाहेर; ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---