क्रिकेटमध्ये सलामीवीर जोडी उत्तम सुरूवात करून देईल अशी सर्व संघाची इच्छा असते. मग तो प्रकार कोणताही असो, मात्र भारताचे सलामीवीर संघाला चांगली सुरूवात करून देण्यात मागे पडत आहेत. याचाच प्रत्यय बांगलादेश दौऱ्यात आला. जेथे संघाचा कर्णधार केएल राहुल लागोपाठ दोन्ही सामन्यांमध्ये कमी धावा करत विकेट गमावून बसला.
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताचे नेतृत्व सर्वप्रथम रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार होता, मात्र त्याला हाताच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) याच्यावर सोपवण्यात आली. ती त्याने अगदी यशस्वीरित्या निभावली आणि भारतला पहिल्या कसोटीत विजय मिळवून दिली. हे सर्व सुरू असताना मात्र त्याचे फलंदाजीकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्याचे दिसले. यामुळे तो चाहत्यांच्या टिकांचा निशाना ठरला आहे. या मालिकेच्या दोन्ही कसोटीमध्ये तो 30 धावांच्या आतच बाद झाला आहे.
राहुलने बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला तो त्याचा कर्णधार म्हणून पहिला कसोटी विजय होता. त्या सामन्यात तो 22 आणि 23 अशा धावा करत बाद झाला. तो दुसऱ्या कसोटीत तरी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र तो पुन्हा एकदा लवकरच तंबूत परतला. त्याने या सामन्यात 10 आणि 2 अशा धावा केल्या. त्याचबरोबर तो 2022 वर्षात एकेरी धावसंख्येवर सर्वाधिक वेळा बाद होणारा भारतीय ठरण्याचा विक्रम केला आहे.
राहुल या वर्षात आतापर्यंत 11 वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्यानंतर शार्दुल ठाकुरचा क्रमांक लागतो. त्याला 10 वेळा एकरी धावेवर तंबूचा रस्ता गाठावा लागला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल आहेत. हे दोघेही 2022 वर्षात प्रत्येकी 9-9 वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाले आहेत.
राहुलने भारताच्या कसोटी संघात 2014मध्ये पदार्पण केले. जवळपास आठ वर्ष कसोटी खेळलेल्या राहुलला या प्रकारात आतापर्यंत केवळ 7 शतकेच करता आली. तसेच तो 2020मध्ये एकही कसोटी सामना खेळला नाही. त्याची मागील 10 डावांमधील कामगिरी पाहिली तर त्याने 123, 23, 50, 8, 12, 10, 22, 23, 10 आणि 2 अशा धावा केल्या आहेत. त्याने 123 धावांची शतकी खेळी 2021मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये केली होती. KL Rahul poor performance in Test cricket continues BANvIND 2nd test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सीएसकेने केला अपमान; आता भिडूने लिलावात साडेचार कोटी घेत रचला इतिहास
सासरे- जावई एकत्र करणार पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम, आफ्रिदीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी