---Advertisement---

मी कधीही विचार केला नव्हता, पण ती गोष्ट धोनीकडून घडली होती

On: मंगळवार, मे 12, 2020 12:40 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुने २०१४मध्ये मेलबर्न कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यात भारतीय संघाचे नेतृत्त्व कॅप्टन कूल एमएस धोनी करत होता.

आता त्या कसोटीतील खास गोष्टींना केएल राहुलने उजाळा दिला आहे. ट्विटरवरील प्रश्नउत्तरांच्या सेशनमध्ये त्याने एका चाहत्याच्या प्रश्नावर हे उत्तर दिले. धोनीकडून कसोटी कॅप स्विकारली तो क्षण कसा होता?, असा प्रश्न चाहत्याने विचारला होता.

यावर उत्तर देताना राहुल म्हणाला, तो एक खास व भावनिक क्षण होता. मी कधी विचार केला नव्हता की त्या मालिकेत मला खेळण्याची संधी मिळेल. त्यात धोनीकडून कसोटी कॅप मिळणे हा सर्वात खास व अविस्मरणिय क्षण होता.

गमतीचा भाग म्हणजे हा सामना धोनीच्या कसोटी कारकिर्दीतील खेळाडू व कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. त्याच्याच नेतृत्त्वाखाली केएल राहुलचे पदार्पण झाले व तेव्हा फलंदाज म्हणून पदार्पण केलेला राहुल आता भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून स्थिरावत आहे. केएल राहुल भारताकडून पुर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून १० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

केएल राहुल भारताकडून ३६ कसोटी, ३२ वनडे व ४२ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने कसोटीत २००६, वनडेत १२३९ तर टी२०मध्ये १४६१ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---