बांंगलादेेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 188 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर 22 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या कसोटी दुसऱ्या सामन्याची चर्चा आता चाहते करत आहेेत. खासकरुन रोहित शर्मा याच्या पुनरागमनाबद्दल जास्त चर्चा होताना दिसत आहे. यावर बऱ्याच माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया देखील येेत आहेत. तो दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितला झेल पकडताना गंभीर दुखापत झाली होती त्यानंतर तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला. अशातच भारताचा कार्यवाहक कर्णधार केएल राहुल याने पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेेत कार्यवाहक कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या फिटनेसद्दल माहिती दिली. त्याच्या स्थितीबद्दल तो म्हणाला की, “रोहित खेळणार की नाही हे दोन-तीन दिवसात आपल्याला समजेल. मला सध्या याबद्दल पूर्ण माहिती नाहीये.” राहुलचे हे विधान आश्चर्यकारक अजिबात नाहीये, कारण जेव्हा नुकतेच त्याला कोही कठोर प्रश्न विचारण्यात आले होते, तेव्हा तो पूर्णपणे बॅकफूटवर जातो.
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी अफाट कष्ट घेत आहे. त्याने मुंबईमध्ये शनिवारी विशेष सराव केला. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितच्या खेळण्यावर काही दिग्गज नाखुष आहेत. भारतीय संंघाचे माजी खेळाडू अजय जडेजा (Ajay Jadeja) म्हणाले की पूर्णपणे फिट झाल्यावरच रोहितने पुनरागमन केले पाहिजे. त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, संघातील ताळमेळ तसाच राहावा यासाठी रोहितने घरी बसले पाहिजे आणि शुबमन गिल चांगले प्रदर्शन करत आहे.तसेच राहितच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांच्या मनात मिश्र प्रतिक्रिया आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे, त्याला बाहेरच बसवा’, भारताच्या दिग्गजाचे रोहितबाबत मोठे भाष्य
आयपीएलचा ‘फ्लॉप करोडपती’ गाजवतोय बिग बॅश! यंदाही ठेवलीये मालामाल होण्याची अपेक्षा