Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलचा ‘फ्लॉप करोडपती’ गाजवतोय बिग बॅश! यंदाही ठेवलीये मालामाल होण्याची अपेक्षा

December 18, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
PBKS-vs-MI

Photo Courtesy: iplt20.com


जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. कोची येथे होणाऱ्या या मिनी लिलावात 405 खेळाडूंचे नाव पुकारले जाईल. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याचे देखील नाव आहे. यापूर्वी एकदाच आयपीएल खेळून करोडपती झालेला रिचर्डसन पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक असून, बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतोय.

आयपीएलच्या मिनी लिलावासाठी अवघ्या पाच दिवसांचा अवधी शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या रिचर्डसन याने बिग बॅशमध्ये दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे.

रिचर्डसन हा बिग बॅश लीगमध्ये स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या पर्थ स्कॉर्चर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. सिडनी सिक्सर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने भेदक गोलंदाजी करताना चार गडी बाद केले. यासाठी त्याने केवळ 9 धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे त्याने आपल्या 24 पैकी 18 चेंडूंवर एकही धाव खर्च केली नाही.

रिचर्डसन याला यापूर्वी देखील आयपीएल मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. 2021 आयपीएल वेळी तो पंजाब किंग्स संघाचा भाग होता. यासाठी त्याला तब्बल 14 कोटींची रक्कम दिली गेलेली. मात्र, तो त्या हंगामात प्रभावित करण्यात यशस्वी ठरला नव्हता. तो दुखापतीमुळे हंगामातून बाहेर होण्यापूर्वी तीन सामने खेळला. त्यामध्ये त्याला 10 च्या सरासरीने धावा फटकावल्या गेल्या. तसेच त्याला केवळ तीन बळी मिळवता आलेले. यावर्षी आयपीएल लिलावात त्याची  आधारभूत किंमत 1.50 कोटी इतकी आहे. आपल्याला पुन्हा एकदा आयपीएल खेळण्याची संधी मिळेल असा विश्वास त्याने व्यक्त केला होता.

(Jhy Richardson Hopeful For Pick Him IPL 2023 Auction)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला घाबरतो शाहरुख खान! म्हणाला, ‘जेव्हा तो केकेआरविरुद्ध फलंदाजीला येते…’
केवळ 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुंच्या नाकी-नऊ, कागिसो रबाडाने दिले लागोपाठ धक्के


Next Post
Rohit-Sharma

'अरे, त्याला बाहेरच बसवा', भारताच्या दिग्गजाचे रोहितबाबत मोठे भाष्य

Rohit Sharma and KL Rahul

रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार का? पत्रकार परिषदेत केएल राहुलने केला खुलासा

IND v BAN Test Siraj- Axar- KL Rahul_ Mehidy

बांगलादेशला चीत केलेल्या टीम इंडियाचा ठरला प्लॅन! फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 'या' संघाला देणार पाठिंबा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143