मुंबई | भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलने विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी त्याला मदत केल्याचा एक खास किस्सा सांगितला आहे.
जेव्हा मेलबर्नमध्ये २२ वर्षीय केएल राहुलने २०१४ला कसोटी पदार्पण केले होते तेव्हा तो दोन्ही डावात फ्लाॅप ठरला होता. यामुळे तो प्रचंड तणावाखाली आला असताना त्याचा हा तणाव दुर व्हावा म्हणुन विराट-अनुष्का त्याला डीनरला घेऊन गेले होते.
“विराट आणि अनुष्काबरोबर माझे खुपच जवळचे मैत्रीपुर्ण संबंध आहेत. त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडे खास गोष्ट आहे. जेव्हा मी कसोटी पदार्पण केले त्या सामन्यात अनुष्का मेलबर्नला तो कसोटी सामना पहायला आली होती. तेव्हा माझे पदार्पण निट न झाल्यामुळे मी नाराज असल्याचे तीने पाहिले. ती माझ्या रुममध्ये आली आणि मला एकट बसु देणार नाही अस बजावल तसेच क्रिकेटबद्दल विचार न करण्याचीही ताकिद दिली. नंतर ते मला डीनरला घेऊन गेले.” असे केएल राहुल म्हणाला.
“मी त्यांचा डेटमध्ये गेलेलो एकप्रकारे तिसरा व्यक्ती ठरलो होतो.तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कारकिर्दीत आलेले चढउतार सांगितले तसेच मी अपयश येणारा पहिलाच व्यक्ती नाही असेही सांगितले. तसेच पुढच्या सामन्याला ७-८ दिवस बाकी होते, परंतु त्यांनी मला एकट्याला कुठेही सोडले नाही.” असेही हा खेळाडू पुढे म्हणाला.
राहुलने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात १ धाव केली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–५ वर्षांपुर्वी याच दिवशी धोनी बनला होता जगातील सर्वात परिपुर्ण कर्णधार!
–माजी कर्णधार अनिल कुंबळे सुरु करतोय नवी इनिंग!