भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघ आणि चाहत्यांची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पूर्णपणे फिट नसल्यामुळे राजकोट कसोटीतून त्याचे नाव कमी केले गेले आहे. बीसीसीआयकडून राहुलच्या जागी दुसऱ्या एका खेळाडूला संघात घेतले गेले आहे.
केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचा महत्वाचा भाग आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 86 आणि 22 धावांची खेळी केली होती. पण राहुल या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटीआधी दुखापतग्रस्त असल्याचे समोर आले. माडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे राहुल मालिकेतील सलग दुसरा सामना देखील खेळू शकणार नाहीये. सध्या तो बेंगंलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहेत. राजकोट कसोटीसाठी राहुलच्या जागी बीसीसीआयने देवदत्त पटिक्कल (Devdutt Padikkal) याला संधी दिली आहे. पडिक्कल याआदी भारतासाठी 2021 मध्ये दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण कसोटी फॉरमॅटमध्ये त्याला राजकोट कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले, तर हा त्याचा पदार्पणाचा सामना असेल.
KL Rahul ruled out of the 3rd Test against England. [Express Sports]
– Devdutt Padikkal replaces KL Rahul in the team. pic.twitter.com/bLfReAnVj5
— Johns. (@CricCrazyJohns) February 12, 2024
दरम्यान, केएल राहुलप्रमाणेच रविंद्र जडेजा देखील दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे खेळला नव्हता. राजकोट कसोटीत जडेजा खेळण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. पण बीसीसीआयकडून अद्याप याबाबत कुठलीच माहिती मिळाली नाहीये. भारताचा प्रमुख पलंदाज विराट कोहली देखील वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून बाहेर पडला आहे.
राजकोट कसोटी 15 फेब्रुवारी सुरू होऊन 19 फेब्रुवारीला संपेल. त्यानंतर मालिकेतील चौथा सामना 23 ते 27 फेब्रुवारीदरम्यान रांचीमध्ये आयोजित केला गेला आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धर्णशाला याठिकाणी 7 ते 11 मार्चदरम्यान आयोजित केला गेला आहे. (KL Rahul ruled out of the 3rd Test against England)
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
महत्वाच्या बातम्या –
जामनेरमध्ये सिकंदर शेख अन् चौधरीचा विजय, १५ विजेत्यांना चांदीच्या गदा, मानाचा पट्टा आणि लाखोंची बक्षिसे
‘त्या घटनने माझ्या कुटुंबावर परिणाम झाला…’, पाचव्या शतकानंतर मॅक्सवेलकडून वाईट अनुभवाचा उल्लेख