---Advertisement---

WTC फायनलसाठी टीम इंडियातून केएल राहुलचा पत्ता कट, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

On: सोमवार, मे 8, 2023 5:22 PM
KL-Rahul
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सुरू असतानाच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023बाबत मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयने राहुलच्या बदली खेळाडूचेही नाव सांगितले आहे.

बीसीसीआयचे ट्वीट
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातून केएल राहुल (KL Rahul) बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, राहुलच्या जागी भारतीय संघात ईशान किशन (Ishan Kishan) या युवा खेळाडूला संधी मिळाली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत लिहिले की, “केएल राहुल हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात ईशान किशन या खेळाडूला संधी मिळाली आहे.”

याव्यतिरिक्त बीसीसीआयने ट्वीटमध्ये राखीव असलेल्या खेळाडूंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. बीसीसीआयने ट्वीटमध्ये पुढे सांगितले की, “राखीव खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव असणार आहेत.”

केएल राहुल हा आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्याला आयपीएलमधील 43व्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघाच्या फलंदाजीदरम्यानही शेवटच्या क्रमांकावर मैदानावर आला होता. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यानंतर तो संघाच्या पुढील दोन्ही सामन्यात खेळला नाही. त्याच्या जागी कृणाल पंड्या याला संघाचा कर्णधार बनवले आहे.

अशात केएल राहुल बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत त्याची उणीव भासते की नाही, हे येणारा काळच सांगेल. मात्र, त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज ईशानला संधी मिळाली आहे. अशात त्याला जर खेळायची संधी मिळाली, तर तो स्पर्धेत कशी कामगिरी करतो, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. (KL Rahul ruled out of WTC final against Australia and Ishan Kishan named as his replacement in the squad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RCB संघ IPL 2023च्या प्ले-ऑफमध्ये कशी करू शकतो एन्ट्री? सोप्या पद्धतीने घ्या जाणून
‘हा सामना लवकर विसरू…’, 4 विकेट्स घेऊनही हैदराबादविरुद्ध पराभव होताच चहलची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---