---Advertisement---

रहाणेनंतर साहाला मिळणार का सेंकड चान्स? WTC फायनलआधी चर्चेला आला ऊत

On: सोमवार, मे 8, 2023 10:43 AM
---Advertisement---

रविवार (7 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात सामन्यात यजमान गुजरात टायटन्सकडून लखनऊ सुपरजायंट्सला 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरातच्या या विजयात त्यांचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल व वृद्धिमान साहा यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. साहा याचा आयपीएलमधील सध्याचा फॉर्म पाहता त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची आणखी एक संधी मिळू शकते का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

वृद्धिमान साहा याने लखनऊविरुद्ध या सामन्यात संघाला वेगवान सुरुवात दिली. गिलसह त्याने पहिल्या गड्यासाठी 12.1 षटकात 142 धावा कुटल्या. साहाने बाद होण्यापूर्वी 43 चेंडूवर 10 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 81 धावा फटकावल्या. या संपूर्ण हंगामातील त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यास त्याचा फॉर्म दिसून येतो. त्याने 11 सामन्यात 273 धावा केल्या असून, संघाला तो सातत्याने चांगली सुरुवात देण्यात यशस्वी ठरला आहे.

 

त्याची ही कामगिरी पाहता त्याला जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी द्यावी अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे. केएल राहुल दुखापतग्रस्त होऊन संघातून बाहेर पडल्याने, अनुभवी यष्टीरक्षक म्हणून त्याचा पर्याय पुन्हा एकदा खुला झाला आहे.

 

साहा याने भारतीय संघासाठी आपला अखेरचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध 2021 मध्ये खेळला होता. त्याला त्यानंतर संघातून बाहेर करण्यात आल्यावर मोठे वादळ निर्माण झालेले. सध्या 38 वर्षांच्या असलेल्या साहाच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 40 सामन्यात 1353 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 29.51 अशी राहिली आहे. त्याचे यष्टीरक्षण  कौशल्य हे इतरांपेक्षा उत्कृष्ट असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता देखील निर्माण झालीये. मात्र, संघ व्यवस्थापन आता काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Social Media Users Backs Wriddhiman Saha For WTC Final Against Australia After Performing In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लेगस्पिन ग्रॅंडमास्टर’ चहलने केली ब्राव्होची बरोबरी! आयपीएलमध्ये इतिहास रचण्यापासून केवळ एक विकेट दूर
याला म्हणतात इम्पॅक्ट! अवघ्या 7 चेंडूवर फिलिप्सने हिसकावला रॉयल्सच्या तोंडून विजयाचा घास! पठ्ठ्या बनला थेट सामनावीर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---