आयपीएलच्या मागील हंगमामध्ये एका सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार केएल राहुलवर सर्वांसमोर टीका केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 10 गडी राखून झालेल्या दारूण पराभवानंतर गोयंकाचा राग अनावर झाला. मात्र, राहुलने संभाषणात कमालीचा संयम दाखवला. या दोघांचे व्हिडिओ त्यावेळी व्हायरल झाले होते. आता एलएसजीचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतमने गोयंका आणि राहुल वादावर एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. गौतम एलएसजी विरुद्ध एसआरएच सामन्यात खेळला होता.
क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीत गौतम म्हणाला, “आम्ही ज्या प्रकारे हरलो त्यामुळे ते (फ्रँचायझी मालक संजीव गोएंका) थोडे निराश झाले होते. प्रत्येक माणसाला भावना असतात आणि ते चढ-उतारांमधून जात असतात. मात्र, राहुलने आपला त्यावेळी थंडावा ठेवला. राहुलने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ते कोणाचीही बाजू घेतली नाही. राहुलने संयम राखला आणि सर्व काही ऐकून घेतले कारण त्यांना (गोयंका) स्पष्टीकरण देण्यापूर्वी पराभवाचे विश्लेषण करायचे होते.”
अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला, “हे थोडेसे भावनिक होते. परंतु मला वाटते की एक व्यक्ती म्हणून ज्याने संघासाठी खूप वेळ आणि मेहनत घेतली आणि ज्या प्रकारे आम्ही खेळ (सामना) गमावला, ते कदाचित हृदयद्रावक होते. मला वाटते की ते संघाबद्दलची त्याची उत्कटता आणि संघासाठीची त्याची मूल्ये दर्शवते. आपण सर्वांनी जिंकावे अशी त्यांची इच्छा आहे आणि आपण त्याचा आनंद घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. पराभवाने त्यांची निराशा झाली आणि त्यामुळेच त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
गोयंका यांच्या राहुलसोबतच्या वागणुकीची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या वादानंतर गोयंका यांनी राहुल यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले होते. त्यानंतर दोघांचे हसत-हसत मिठी मारल्याचे फोटो समोर आले. आयपीएल 2024 मध्ये एलएसजीची कामगिरी चांगली नव्हती. एलएसजीने 14 पैकी सात सामने गमावले. लखनऊचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्याआधीच्या दोन मोसमात एलएसजीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा-
मुंबईत जुन्या मित्रांसोबत रमला अगस्त्य, पण अजूनही वडील हार्दिकशी भेट न झाल्याने चर्चांना उधाण
भावाचं यश पाहून सरफराजच्या डोळ्यांत पाणी! मुशीर खानच्या शतकानंतर सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
दुलीप ट्रॉफी सामन्यात शुभमनने अंपायरलाच शिकवली फलंदाजी? पाहा व्हायरल व्हिडिओ