अबु धाबीच्या मैदानावर रविवारी (१ नोव्हेंबर) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेला सामना किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ‘करा अथवा मरा’ सामना होता. मात्र प्ले ऑफच्या शर्यातीतून बाहेर पडलेल्या चेन्नईने पंजाबला ९ विकेट्सने मात दिली. यामुळे पंजाबसाठीही प्ले ऑफची दरवाजे बंद झाले. यासाठी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने एका सामन्यात पंचांच्या शॉर्ट धाव देण्याच्या निर्णयाला जबाबदार ठरवले आहे.
शॉर्ट रनच्या निर्णयामुळे राहुल निराश
चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना राहुल म्हणाला की, “हा हंगाम आमच्यासाठी खूप निशारादायी राहिला. काही सामन्यात आम्ही कमालीचे प्रदर्शन करुनही शेवटी आमच्या बाजुने निकाल लागला नाही. यासाठी आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. एका सामन्यातील तो शॉर्ट धाव घेण्याचा निर्णय आम्हाला महागात पडला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. सामन्यापुर्वी आम्हाला आशा होती की आम्ही चेन्नईला १८०-९० धावांचे लक्ष्य देऊ. मात्र दबाव झेलण्यात आम्ही अपयशी ठरलो.”
काय आहे शॉर्ट रन प्रकरण?
२० सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पंजाबचा हंगामातील पहिला सामना झाला होता. तो सामना दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. त्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत पंजाबपुढे १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने १८व्या षटकापर्यंत ६ बाद १३३ धावा केल्या होत्या. आता त्यांना विजयासाठी केवळ २४ धावांची आवश्यकता होती.
त्यानंतर डावातील १९वे षटक टाकण्यासाठी दिल्लीचा ‘डेथ ओव्हर स्पेशलिस्ट’ कागिसो रबाडा आला. त्याच्या षटकातील दूसऱ्या चेंडूवर मयंक अगरवालने शानदार चौकार मारला. रबाडाचा पुढील चेंडू फुल टॉस होता. त्यावर मयंकने २ धावा घेतल्या. मात्र नॉन स्ट्राईकर बाजूला असलेल्या ख्रिस जॉर्डनने पहिली धाव घेताना त्याची बॅट क्रिजच्या आत टेकवली नाही. त्यामुळे पंचांनी ती शॉर्ट धाव असल्याचे घोषित केले आणि दिल्लीच्या खात्यात केवळ १ धाव जमा झाली.
खरे तर, टिव्हिवर स्लो मोशनमध्ये पाहिल्यानंतर स्पष्ट दिसत होते की, ती शॉर्ट धाव नव्हती. जॉर्डनने धाव घेताना त्याची बॅट योग्य प्रकारे क्रिजच्या आत ठेवली होती. मात्र पंचाच्या त्या एका निर्णयामुळे पंजाबला एक कमी धाव मिळाली. पुढे या एका धावेमुळे सामना बरोबरीत सुटला आणि दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सामना खिशात घातला.
चेन्नईचा शेवट गोड
चेन्नईने मुंबईविरुद्धचा पहिला सामना जिंकत हंगामाची दणक्यात सुरुवात केली होती. मात्र पुढे त्यांच्या प्रदर्शनात उतार पाहायला मिळाला. त्यामुळे चेन्नई संघ सर्वांच्या आधी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. परंतु त्यानंतर उर्वरित सामन्यात त्यांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि हंगामातील आपले शेवटचे तीनही सामने जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या-
World Cup 11: अंतिम सामन्यातील धोनीच्या षटकारावर जॉस बटलरने दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
गर्वाचे घर खाली! सहज ट्वीट सेव्ह करतो म्हणणारा राजस्थान संघ पडला तोंडघशी; ट्रोलर्सनी धरलं धारेवर
पॅट कमिन्सने साकारला कोलकाताचा ‘रॉयल’ विजय; प्लेऑफमधून राजस्थानचा पत्ता कट
ट्रेंडिंग लेख-
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?