---Advertisement---

GT vs DC: दिल्लीत राहुलचा धमाका! किती वर्षांनी आयपीएलध्ये झळकावले शतक?

On: रविवार, मे 18, 2025 10:35 PM
---Advertisement---

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातविरुद्ध केएल राहुलचा (KL Rahul) जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. या सामन्यात राहुलने डावाची सुरुवात केली आणि दमदार शतक झळकावले. केएल राहुलने 60 चेंडूत शतक झळकावले. आयपीएलमधील हे त्याचे पाचवे शतक आहे. राहुलने गुजरातविरुद्ध 65 चेंडूत 112 धावांची खेळी केली. राहुलने 14 चौकारांसह 4 षटकार मारले. राहुलच्या विस्फोटक खेळीमुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना गुजरातला 200 धावांचे लक्ष्य दिले.

65 चेंडूत 4 ष4टकार आणि 14 चौकारांसह 112 धावांची नाबाद खेळी खेळण्याव्यतिरिक्त, राहुलने अभिषेक पोरेल (30 धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची आणि कर्णधार अक्षर पटेल (25) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून दिल्लीला संथ सुरुवातीतून सावरले आणि संघाच्या मजबूत धावसंख्येचा पाया रचला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात संथ होती. मोहम्मद सिराजच्या पहिल्या षटकात राहुलने 2 चौकार मारले पण 10 चेंडूत फक्त 5 धावा काढल्यानंतर फाफ डू प्लेसिसने चौथ्या षटकात मिड-ऑनवर अर्शद खानचा चेंडू सिराजच्या हातात दिला. 4 षटकात दिल्लीची धावसंख्या एका विकेटवर 19 धावा होती.

राहुलने पुढच्या षटकात सिराजच्या चेंडूवर आणखी 2 चौकार मारले आणि नंतर पॉवरप्लेमध्ये कागिसो रबाडाचे स्वागत केले, ज्यामुळे संघाची धावसंख्या एका विकेटसाठी 45 धावांवर पोहोचली. संथ सुरुवातीनंतर अभिषेक पोरेलने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर षटकार मारला. राहुलने 35 चेंडूत रशीद खानच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले.

त्यानंतर पोरेल आणि राहुलने रबाडाच्या चेंडूवर षटकार मारला. राहुलने 12 व्या षटकात साई किशोरच्या चेंडूवर धाव घेऊन संघाचे शतक पूर्ण केले. त्याच षटकात पोरेलनेही सरळ षटकार मारला, परंतु पुढच्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न करताना त्याने विकेटकीपर जोस बटलरच्या हातात झेल दिला. त्याने चेंडूंचा सामना केला आणि 3 षटकारांसह 1 चौकार मारला.

किशोरने 71 धावांवर असताना राहुलचा कॅच त्याच्याच चेंडूवर सोडला आणि चेंडू 4 धावांसाठी गेला. राहुलने पुढच्या दोन चेंडूंवरही चौकार मारले. 16 व्या षटकात किशोरच्या चेंडूवर चौकार आणि षटकार मारून अक्षरने संघाची धावसंख्या 150 च्या पुढे नेली. पण, पुढच्या षटकात त्याने प्रसिद्धचा चेंडू थर्ड मॅनवर किशोरच्या हातात दिला.

राहुलने 19व्या षटकात प्रसिद्धच्या चेंडूवर षटकार आणि चौकार मारून 60 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. राहुलने शेवटच्या षटकात सिराजच्या चेंडूवर सलग 2 चौकार मारले तर ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 21 धावा) यांनी एक षटकार मारून संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---